रायगड जिल्हयातील माणगाव येथील दिवंगत पत्रकार प्रकाश काटदरे यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत.आज सकाळी व्हॉटस्ऍपवर मी काटदरे कुटुंबाला मदत करण्याचं आवाहन केल्यानंतर आमचे मित्र आणि एक संवेदनशील पत्रकार गजानन जानभोर यांनी तातडीनं काही संस्थांशी चर्चा केली.त्यानुसार नागपूर येथील मैत्री परिवार संस्थेचे चंदु पेंडके आणि जनमंच संस्थेचे अनिल किलोर यांनी प्रकाश काटदरे यांची मुलगी अदिती काटदरेच्या पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे मान्य केले आहे.अगोदरच्या माझ्या पोस्टमध्ये अदिती इंजिनिअर करीत असल्याचा उल्लेख होता.प्रत्यक्षात अदितीन फाईन आर्टची पदवी संपादन केली असून ती आता पुण्यात स्पर्धा परीक्षाची तयारी कऱणार आहे.त्यासाठी मैत्री परिवार आणि जनमंच संस्था अदितीला मदत करणार आहेत.श्री.चंदु पेंडके आणि श्री.अनिल किलोर यांनी अदितीच्या पुढील शिक्षणासाठी जे सहकार्य देऊ केले आहे त्याबद्दल आम्ही उभयतांचे मनापासून आभारी आहोत.त्यासाठी गजानन जानभोर यांनी जे प्रय़त्न केले त्याबद्दल जानभोर यांनाही मनापासून धन्यवाद.