धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद
पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक याच अधिवेशनात मांडण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा विधानसभेत दिले आहे.कालच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळासही मुख्यमंत्र्यांनी असेच आश्वासन दिले होते,सलग दोन दिवसांत दोन वेळा मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिल्यानं या अधिवेशनात शेवटच्या आठडयात कायद्याचे विधेयक येईल आणि ते एकमताने संमत होईल असा आम्हास विश्वास वाटतो.पत्रक ार संरक्षण कायद्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे आम्ही स्वागत करीत असून मुख्यमंत्र्याना धन्यवाद देत आहोत.
आज विधानसभेत आणि विधान परिषदेत हा विषय उपस्थित झाला.भाजपचे आ.आशिष शेलार यांनी या मुद्दा जोरदारपणे मांडला,त्याबद्दल त्यांचेही आभार.डॉ.निलमताई नेहमीच आमच्याबरोबर राहिल्या आहेत,त्यांचे मनापासून आभार.विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि कॉग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी सातत्यानं हा विषय जिवंत ठेवला आहे.प्रत्येक अधिवेशनात या दोघांनीही हा विषय जाणीवपूर्वक आणि प्रामाणिकपणे मांडला त्यांचेही आभार.निरंजन डावखरे,प्रकाश गजभिये या आमदारांचेही आभार.तसेच हाळवणकर आणि अन्य आमदारांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.सर्वांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत.सर्वांना आता एकच विनंती.हे विधेयक येईल आणि ते एक मताने संमत होईल यादृष्टीने पाठपुरावा आणि प्रयत्न करावा आणि राज्यातील पत्रकारांची दहा वर्षांची मागणी याच अधिवेशनात पूर्ण होईल याचा आनंद पत्रकारांना मिळवून द्यावा ही विनंती. धन्यवाद
एस.एम.देशमुख
निमंत्रक पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती ,
किरण नाईक
विश्वस्त मराठी पत्रकार परिषद मुंबई