धनिकांचं स्थलांतर वाढलं…

पाणी टंचाई,रोजगार आदि कारणांसाठी होणारं स्थलांतर आपण जाणून असतो.मात्र ज्या देशात राहून आपण अब्जाधिश झालो,त्या देशाचा कंटाळा आला म्हणून स्थलांतर करणार्‍या धनदांडग्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे.न्यू वर्ल्ड वेल्थच्या एका सर्वेक्षणानुसार 2017 मध्ये भारतातून सात हजार अतिश्रीमंत व्यक्ती कायमचे परदेशात निघून गेले.त्या अगोदर 2016 मध्ये ही संखा सहा हजार होती.2015 मध्ये 4 हजार होती.अमेरिका,ग्रेट ब्रिटन,कॅनडा ऑस्ट्रेलिया,न्यूझिलंड,सौदी अरेबिया ही श्रीमंतांची पसंती आहे.भारतात 33 लाख 400 अतिश्रीमंत व्यक्ती आहेत.20 हजार 730 व्यक्तींची संपत्ती अब्जावधींच्या घरात आहे.देशातील 1 टक्के लोकांकडं देशाची 72 टक्के संपत्ती एकवटलेली आहे असं मध्यंतरी प्रसिध्द झालेल्या आकडेवारीवरून समोर आलं होतं.हीच ती मंडळी आहे.देशातील या संपत्तीवर डल्ला मारून ही मंडळी आता हळूहळू परदेशात जायला लागली आहे.पुढील काळात हे स्थलांतर वाढणार असून ते देशासाठी धोकादायक असल्याचं हा अहवाल सांगतो..आता बोला..देशप्रेम वगैरे या गोष्टी तुम्हा-आम्हासाठीच उरल्या नाहीत काय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here