सीबीआयने करोडो रूपयांच्या चिटफंड घोटाऴा प्रकरणी ओडिसा भास्कर या दैनिकाचे मालक मधु मोहंती आणि उडिया न्यूज चॅनलचे मालक मनोज दास यांना काल रात्री अटक केली.या अगोदर याच प्रकरणात अन्य एक उडिया पत्रिकाचे मालक विकास स्वैन यांनाही अटक केली गेली होती.अर्थतत्व संस्थाचे प्रमुख प्रदीप सेठी यांनी मोहंती यांना 65 लाख आणि दास यांना 90 लाखांचे कर्ज दिल्याचा दावा केला आहे.दोन्ही आरोपींनी हा दावा फेटाळून लावला आहे.