पाकिस्तानात असलेल्या पीटीआय आणि हिंदूच्या दोन पत्रकारांना एका आठवड्याच्या देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं आहे,हिंदूच्या मीना मेनन आणि पीटीआय या वृत्तसंस्थेचे स्नेहष फिलीप हे ते दोन पत्रकार आहेत.या अगोदर अन्य दोन परदेशी पत्रकारांना पाकने असेच तडकाफडकी देश सोडायला सांगितले होते.
गेल्या वर्षी नवाझ शरिफने सूत्रे हाती घेतल्यानंतर दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी प्रय़त्न केले जातील असं सांगितलं होतं.मात्र याच वेळेस आयएसआयने दोन भारतीय पत्रकारांना देश सोडून जाण्यास सांगितलं होतं.याचं कारण देताना पाकने म्हटले होते की,भारतात कोणी पाकिस्तानी पत्रकार नाहीत.तथापि नंतर भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांती पीटीआय आणि हिंदू च्या पत्रकारांना पाकमध्ये राहू देण्याचे इस्लामाबादने मान्य केले होते.याच वेळेस भारतातील निवडणुकांच्या कव्हेरजसाठी पाकिस्तानातील काही पत्रकारांना भारतातील काही शहरात जाऊ देण्यासाठी भारत सरकारने व्हिसा दिलेला होता.मात्र आता निकालाला काही दिवसच उरलेले असताना पाक सरकारने अचानक असा निर्णय द्यावा याचं आश्चर्य व्यक्त केल ंजात आहे