आज दिवसभरात,
दोन पत्रकारांवर हल्ले,एकाच्या विरोधात
विनयभंगाची खोटी तक्रार,सांगतील टीव्हीचा
कार्यक्रमच उधळून लावला
महाराष्ट्रातील पत्रकारितेसाठी आजचा दिवस क्लेशदायक होता.आज राज्यात किमान चार पत्रकारांना विविध संकटांचा मुकाबला करावा लागला.इंदापूरच्या निळकंठ मोहिते या पत्रकारास बातमी दिल्याबद्दल बेदम मारहाण केल्याची बातमी मी सकाळीच आपल्याबरोबर शेअर केली होती.त्यानंतर शिरूर येथून बातमी आली.तेथील तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मुकुंद मनोहर ढोबळे याच्या विरोधात कट-कारस्थान करून महिलेच्या वियमभंगाचा गुन्हा दाखल केला गेला.वस्तुतः ज्या महिलेने तक्रार दिली तिनेच आपल्यावर दबाव आणला गेल्याचे मान्य केले आहे.आता पोलिसवाले पत्रकारास अटक करायला टपून बसले आहेत.
तिसरी घटना पिंपरी चिंचवडला घडली .ताथवडे भागात राहणारे राम गायकवाड मर्द महाराष्ट्र हे साप्ताहिक चालवतात.साप्ताहिकात प्रसिध्द झालेल्या बातमीचा राग मनात धरून त्यांच्यावर हल्ला केला गेला.वाकड पोलिसात राम गायकवाड यांनी संजय चव्हाण याच्या विरोधाता तक्रार दाखल केली आहे.
चौथी घटना सांगलीत घडली.टीव्ही-9वर आपण यांना पाहिलंत का हा कार्यक्रम दाखविला जातो.या कार्यक्रमाचं शुटिंग करू नका म्हणून कॉग्रेस कार्यकर्त्यांनी टीवही -9 चे राजेंद्र कांबळे तसेच अन्य टिमला धमक्या दिल्या आणि कार्यक्रम बंद पाडला गेला.
या चारही घटना मी आरआरपाटलांच्या कानावर घातल्या आङेत.इंदापूरच्या प्रकरणात आरोपीला उद्या पर्यत अटक झाली नाही तर पत्रकार पोलिस ठाण्यासमोरच उपोषणाला बसतील असा इशारा जिल्हा पत्रकार ंसंघातर्फे देण्यात आला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या सर्व घटनाचा निषेध करीत आहे