रिपोर्टिंग करताना सरकारी गोपनीयता कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून मयानमारचया न्यायालयाने रॉयटर या वृत्तसंस्थेचया दोन पत्रकारांना प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. वा लोन आणि क्यूब सो ओ अशी दोघांची नावे आहेत. हा निण॓य म्हणजे प्रसार माध्यमांवर चा घाला असल्याची टीका केली जात आहे. म्यानमारमधील रोहिंग्या शरणार्थींवर होत असलेल्या हिंसेचे वार्तांकन केल्यामुळे रॉयटर्सचे दोन पत्रकार डिसेंबरपासून तुरुंगात आहेत.