देशात 9 वर्षात 24 पत्रकारांच्या हत्त्या
भ्रष्टाचारास विरोध केला,माफियांच्या कारवायांचा पर्दाफास केला,राजकीय हितसंबंध दुखावले गेले किंवा एखादया विचारसरणीस विरोध केल्यानं संतापलेल्या हितसंबंधियांकडून पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या हत्त्या होण्याच्या घटना जगभर होत असतात.भारतात लोकशाहीने विचारस्वातंत्र्य,लेखन स्वातंत्र्य दिले असले तरी भारतातही अशा घटना सातत्यानं घडत असतात.पत्रकारांची हत्त्या करायची आणि थेट विरोधी आवाजच बंद करायचा प्रयत्न होत असतो.लंकेश पत्रिकेच्या संपादिका गौरी लंकेश यांची झालेली हत्त्या या मालेतली ताजी घटना आहे.उजव्या विचारसरणीला विरोध केल्यानं त्यांची हत्त्या झाल्याची चर्चा आहे.गौरी लंकेश यांच्या हत्येनें पुन्हा एकदा वृत्तपत्र स्वातंत्र्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.’हत्त्या व्यक्तीची होऊ शकते ,विचारांची नाही’ असे म्हणून वाढत जाणार्या अशा घटनांकडं दुर्लक्ष करता येणार नाही.कारण काळ सोकावत जात आहे.नरेंद्र दाभोळकर यांची हत्त्या झाली त्याला तीन-चार वर्षे झाली,त्यांचे मारेकरी अद्याप सापडलेले नाहीत त्यामुळं मारेकर्यांची हिंमत वाढली आहे.ती घातक आहे.या विरोधात आवाज उठविला गेला पाहिजे.महाराष्ट्रात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषद गेली दहा-बारा वर्षे या विरोधात लढा देत आहेत.त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.महाराष्ट्रात सरकारला पत्रकार हल्ला विरोधी कायदा करावा लागला आहे.देशभर हा कायदा झाला पाहिजे असे प्रयत्न आता होण्याची गरज आहे.
देशात 2008 पासून आजपर्यंत 24 पत्रकारांच्या हत्त्या झालेल्या आहेत.महाराष्ट्रातही 1975 नंतर 22 पत्रकारांच्या हत्त्या झालेल्या आहेत.अर्थात ही आकडेवारी ज्या घटनांची चर्चा देशभर झाली त्याच घटनांची आहे.प्रत्यक्षात मारले गेलेल्या पत्रकारांची संख्या यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.2008 नंतर ज्या पत्रकारांची हत्त्या झाली आहे त्यांची नावे आणि कारणं माहिती करून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा–
1 एप्रिल 2008 महंमद मुस्लिमुद्दीन (आसाम)
11 मे 2008 अशोक सोधी (जम्मू-काश्मीर)
13 ऑगस्ट 2008 जावेद अहमद (चॅनल -9 श्रीनगर)
25 नोव्हेंबर 2008 विकास रंजन, (हिंदुस्थान,बिहार)
20 जुलै 2010 विजय प्रतापसिंग (इंडियन एक्स्प्रेस ,अलहाबाद युपी)
11 जून 2011 जेडे मिड डे (मुंबई,महाराष्ट्र)
18 फेबु्रवारी 2012 चंद्रिका राय मध्य प्रदेशमधील उमरिया येथील पत्रकार चंद्रिका राय यांची,त्यांची पत्नी आणि मुलाची हत्त्या करण्यात आली.खाण माफियांनी ही हत्त्या केल्याचा संशय
1मार्च 2012 राजेश मिश्रा, (मिडिया राज,मध्यप्रदेश)
23 डिसेंबर 2012 द्वाजामणीसिंग ( प्राईमन्यूज मनिपूर)
20 ऑगस्ट 2013 नरेंद्र दाभोळकर, (साधना पुणे महाराष्ट्र)
7 सप्टेंबर 2013 राजेश वर्मा, (आबीएन -7,युपी)
6 डिसेंबर 2013 साई रेड्डी, (देशबंधू छत्तीसगढ)
27 मे 2014 तरूण कुमार, (आचार्य कनक टीव्ही ओरिसा)
26 नोव्हेंबर 2104 एमव्हीएन शंकर. (आध्रप्रभा आंध्रप्रदेश,)
8 जून 2015 जगेंद्रसिंग (फ्रिलान्स,शहाजहांपूर युपी)
20 जून 2015 संदीप कोठारी, (फ्रिलान्स मध्यप्रदेश)
८ जुलै २०१५ आ ज तक चे अक्षय सिंग ( मध्यप्रदेश व्यापम घोटाळा )
17- जुलै 201५ पत्रकार राघवेंद्र दुबे
मुंबईत एका बारवर रेड पडली असता त्याचं वार्तांकन कऱण्यासाठी
गेलेल्या दुबे यांची हत्त्या कऱण्यात आली.
1 ऑक्टोबर 2015 अजय विद्रोही
बिहारच्या सीतामढी जिल्हयातील ज्येष्ट पत्रकार
अजय विद्रोही यांची स्थानिक गुंडांनी गोळी मारून हत्या केली.
3 2015ऑक्टोबर हेमंतसिंह यादव
उत्तर पदेशातील एका वाहिनीचे पत्रकार हेमंतसिंह यादव याची आज चंदौली
जिल्हयातील अवसरीया गावाच्या जवळ हत्त्या कऱण्यात आली.हेमंत
कमालपुरा येथून आपल्या घरी जात असताना बाईकवरून आलेल्या
दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार केले.
25 ऑक्टोबर 15 मिथलेश पांडे
गया जिले के दैनिक भाष्कर अखबार के परैया प्रखंड के स्थानीय पत्रकार मिथलेश पांडे उर्फ़ भोला पांडे को अपराधियों ने घर में घुस कर गोली मार कर ह्त्या कर दी ह’ै . पत्रकार मिथलेश पांडे गया जिले के ग्राम कसथा के रहने वाले थे . घटना अब से कुछ देर पहले की है .. पूर्व में यह दैनिक जागरण से जुड़े थे
13 मे 201६ राजदेव रंजन + बिहारमधील सिवान येथे हिंदुस्थान या वृत्तपत्रांचे ब्युरोचीफ राजदेव रंजन यांची शुक्रवार दिनांक 13 मे 2016 रोजी गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली.सिवान रेल्वेस्थानकाच्या परिसरात आपल्या गाडीतून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या.बिहारमध्ये सध्या रोड रेंज प्रकरण गाजत आहे.त्यात आमदाराचा मुलगा आरोपी आहे.त्यावर राजदेव यांनी अधिक प्रकाश टाकत बिहारमधील कायदा सुव्यवस्थेचा पंचनामा केला होता.त्यांनी याबाबत राज्य सरकारवही टीका केली होती.-
5 सप्टेंबर 2017 ः ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश
बंगलुरू येथील लंकेश पत्रिका साप्ताहिकाच्या संपादिका,ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या घरात घुसून गोळ्या झाडून हत्त्या.उजव्या विचारसरणीला विरोध करणारी भूमिका त्यांनी सातत्यानं मांडल्यानं ही हत्या झाल्याचं बोललं जातं.
———————————————————————————————————–