उरण- देशाच्या विकासात बंंदरांचे असलेले महत्व लक्षात घेऊन देशातील बंदरांचा विकास कऱण्यात येणार असून शिपिंग बांधणी उद्योगालाही चालना देण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रायगड जिल्हयातील उरण येथील जेएनपीटी येथील कार्यक्रमात बोलताना केली.
जेएनपीटी येथील विशेष आर्थिक क्षेत्राची पायाभरणी, जेएनपीटीला जोडणाऱ्या महामार्गाच्या आठपदरीकरणाच्या कामाचे भूमीपूजन तसेच प्रकल्प बाधितांना साडेबारा टक्के विकसित भूखंडांचे वितऱण पंतप्रधानांच्या हस्ते आज कऱण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.या काार्यक्रमास राज्यपाल के.शंकरनारायण,मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,अनंत गीते आदि उपस्थित होते.3524 प्रकल्पग्रस्तांपैकी प्रातिनिधीक स्वरूपात चार प्रकल्पग्रस्तांना पंतप्रधानांच्या हस्ते त्यांच्या कागदपत्रांचे वितरण करण्यात आले.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली आणि समारोप छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी केला.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात विकास,रोजगार निर्मिती,निर्यातवृध्दी ,गुंतवणूकलवृध्दी आदि बाबींवर विशेष भर दिला.
.सेझच्या विकासात येणारे अडथळे दूर करण्यात येतील असे आश्वासन देत पंतप्रधानांनी जगाच्या बाजारात भारत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करू शकेल अशा उद्योगांना सेझच्या माध्यमातून प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.त्यासाठी केंद्र आणि राज्यांनी हातात हात घालून काम करण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली.
प्रारंभी नितीन गडकरी यांनी जेएनपीटीमध्ये स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याची घोषणा केली तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पश्चिम घाट पर्यावरणाबाबतच्या माधवराव गाडगीळ आणि कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींबाबत स्पष्टता यावी अशी मागणी केली.
पंतप्रधानांचे दोन चिमटे …
यावेळी बोलताना पंतप्रधानंानी माध्यमं सकारात्मक बातम्या देत नसल्याचा चिमटा काढला.तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही चिमटा काढला.मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केंद्रातील काही टॅक्सच्या तरतुदीमुळे राज्यातील 146 मंजूर सेझ पैकी 23 सेझनी ते विकसित न कऱण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.सरकारनं याबाबत स्पस्टता हवी असे सांगतानाच महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीची माहिती दिली.यावर बोलताना पंतप्रधान म्हणाले,सेझची बिमारी जुनी आहे.त्यासाठी चांगल्या डॉक्टरांची गरज होती ते सुरू कऱण्यासाठी आमचे प्रय़त्न सुरू आहेत.मात्र यापुर्वी मुख्यमंत्र्यांना हा मुद्दा मांडता आला नव्हता असा चिमट मोदींनी काढला.