देशभर पत्रकार सुरक्षा कायदा लागू कऱण्याची
विविध पत्रकार संघटनांची मागणी
उत्तर प्रदेशमधील शहाजहांपूरमधील पत्रकार जगेंद्र यांना जिवंत जाळण्याच्या घटनेचे पडसाद देशभर उमटलेले असतानाच कानपूर येथील आज का सच दैनिकाचे पत्रकार दीपक मिश्रा यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.त्यात ते गंभीर जखमी झालेले आहेत.या दोन्ही घटनाबरोबर इकडं महाराष्ट्रात एनडीटीव्हीचे अौरंगाबादचे प्रतिनिधी अशोक गीते यांच्यावरही हल्ला करण्यात आला.हे सारे हल्ले विविध राजकीय पक्षांच्या लोकांकडून झाले असल्याने देशातील सवर्च राज्यात पत्रकारिता कऱणे किती कठीण झाले आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे.त्यामुळे देशभर पत्रकार सुरक्षा कायदा लागू करावा अशी मागणी युपी तसेच दिल्लीतील विविध पत्रकार संघटनांनी सरकारकडं केली आहे.महाराष्ट्रात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती गेली पाच वषेर् सातत्यानं ही मागणी करीत आहे.