देवेद्र भुजबळ यांची अचानक औरंगाबादला बदली.

गोविंद अहंकारीनाही नाशिकला हलविले,

अनेक जिल्हा माहिती अधिकार्‍यांच्या बदल्या.

मंत्रालयात गैरसोयीच्या ठरणार्‍या अधिकार्‍यांना मुंबई बाहेर पाठविण्यात एका लॉबीला यश आलं असून संचालक देवेंद्र भुजबळ आणि उपसंचालक गोविंद अहंकारी यांना मुंबईबाहेर पाठविण्यात आलं आहे.भुजबळ यांना दीर्घकाळ रिक्त असलेला आौरंगाबाद विभागाचे संचालकाचा कारभार सोपविला गेला आहे.त्यांच्या जागेवर कोण येणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही..भुजबळ हे परदेश दौर्‍यावर असतानाच आज सरकारने त्यांची बदली केली आहे.विद्यमान तीन संचालकांमध्ये भुजबळ हे सर्वात ज्येष्ठ असतानाही त्यांना मुखयालयाच्या बाहेर पाठविण्यात आल्याची चर्चा मंत्रालयात आहे.गोविंद अहंकारी जेम तेम तीन-चार महिन्यापुर्वीच उपसंचालक माहिती म्हणून मंत्रालयात रूजू झाले होते.रोखठोक स्वभाव आणि नियमानुसार काम करणारे अधिकारी अशी ओळख असणार्‍या अहंकारीचं काम अनेकाना पचलं नाही त्यामुळं त्यांची बदली करण्यात असी हितसंबंधी यशस्वी झाले आहेत.त्यांना उपसंचालक नाशिकला पाठविले गेले आहे.जळगावचे मिलिंद दुसाणे आता रायगडचे जिल्हा माहिती अधिकारी झाले आहेत.रायगडचे राजू पाटोदेकर मंत्रालयात रुजू होतील.सातार्‍याचे प्रशांत सातपुते यांची मुंबईला बदली करण्यात आली आहे.राजेश यसनकर आता चंद्रपूरचे माहिती अधिकारी होतील.बीडचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल अलूरकर यांची परभणीला बदली करम्यात आली आहे.नगरचे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना पुन्हा एकदा पुण्याला हलविण्यात आले आहे.अकोल्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची बदली सातार्‍याला करण्यात आली आहे.इतर काही माहिती अधिकार्‍यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.या बदल्यांमागे मोठे राजकारण खेळले गेले अशी चर्चा असून मंत्रालयातील एका लॉबीला अनुकुल ठरतील असेच अधिकारी मंत्रालयात आणले गेले आहेत..–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here