बीडमधील पूण्यनगरीचे वरिष्ठ पत्रकार भास्कर चोपडे गंभीर आजारी आहेत.त्यांच्यावर औरंगाबादेत उपचार सुरू आहेत.त्यासाठी मदतीची आवश्यकता आहे.मराठी पत्रकार परिषदेने त्यासाठी आवाहन केल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला असून बीड येथील कार्यारंभ या दैनिकातील सर्व कर्मचार्‍यांनी भास्कर चोपडेंसाठी एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.सरकारी मदतीवर अवलंबून न राहता पत्रकार आता दुसर्‍या पत्रकारासाठी पुढे येत आहेत ही फारच मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे.कार्यारंभ या दैनिकाचे संपादक आणि त्यांच्या टीमला परिषदेच्यावतीने मनापासून धन्यवाद.
 
*बीडहून आलेली बातमी*.
 
*दै कार्यारंभचे कर्मचारी पञकार भास्कर चोपडेच्या उपचारा साठी एक दिवसाचे वेतन देणार*
 
*बीड येथील पञकार व मराठी पञकार परीषदेचे जिल्हा सरचिटणीस भास्कर चोपडे यांच्या वर औंरगाबाद येथे कमलनयन बजाज हाॕस्पीटल मध्ये उपचार सुरू असून उपचारा साठी आर्थीक मदत करण्याचे अवाहण मराठी पञकार परीषदेच्या वतीने करण्यात आले.अनेक हात मदती करता सरसावले बीड, माजलगाव, परळी, आष्टी येथील पञकार बांधव मदती करता सरसावले बीड येथील दै.कार्यरंभ चा पुर्ण परीवार हि मदती करता* *सरसावला व सर्वांनी आपले एकदिवसाचे वेतन उपचारा साठी देण्याचा निर्णय घेऊन एकपाऊल पुढे टाकले.पञकार म्हणूण दुसऱ्याच्या मदती करता सरसावणारे* *पञकार बांधव आपले पञकार बंधू भास्कर चोपडे यांच्या उपचारा साठी मदत करण्यास पुढे आले व आदर्श असा पांयडा पाडला असून भास्कर चोपडे निश्चीत लवकर बरे होतील आशी भावना प्रत्येक पञकार बांधव व्यक्त करत आहे*
*सर्व सहकार्य करणाऱ्या पञकार बांधवाचे आभार*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here