चार किंवा चार पेक्षा जास्त लोक जेथे जमतात तेथे बातमी असते,असे जर्नालिझमच्या अभ्यासक्रमात सांगितले जाते.आरएसएसच्या दसरा मेळाव्याला जर हजारो लोक जमत असतील तर तेथे बातमी असणारच.ही बातमी असते म्हणूनच गेली अनेक वर्षे प्रिन्ट आणि इलेक्टॉनिक मिडिया नागपूरचा हा दसरा मेळावा कव्हर करीत आलेला आहे.विविध खासगी वाहिन्याही गेली काही वर्षे नागपूरचा दसरा मेळावा लाइव्ह दाखवत आलेल्या आहेत.अशा स्थितीत दूरदर्शन ही वृत्त वाहिनी असेल आणि या वाहिनीने आरएसएस प्रमुख मोहन भागवत याचं भाषण लाइव्ह दाखविलं असेल तर त्यावरून आकाश पाताळ एक कऱण्याचं कारण नाही.उलट पक्षी यापूर्वीपासूनच हे व्हायला पाहिजे होतं.पण ते झालं नाही.कारण देशात कॉग्रेसचं सरकार होतं.युपीए सरकारच्या काळात राजीव गांधी फाउडेशनचे कार्यक्रम दूरदर्शन लाइव्ह दाखवायचे ते कॉग्रेसवाल्याने मान्य होतं,लोकसभा निवडणुकीच्या अगोदर नरेंद्र मोदी यांची मुलाखत एडिट केली गेली ते कॉग्रेसला चालतं मग मोहन भागवत यांचा कार्यक्रम लाइव्ह दाखविला असेल तर एवढा गहजब का ? .मी कुठल्या विचारांचं समर्थन किंवा विरोध करीत नाही .मी या घटनेकडं केवळ बातमी म्हणून बघतो.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीत काहींचे काही आक्षेप आहेत हे जरी खरे असले तरी या संघटनेला देशात बंदी नाही.बंदी असलेल्या आणि देशविरोधी कारवायात अडक लेल्या अनेक म्होरक्यांच्या मुलाखती विविध वाहिन्यावरून दाखविल्या जातात.वास्तवात त्याला विरोध व्हायला हवा पण त्याला कोणी आक्षेप घेत नाही मग मोहन भागवत यांच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणाला आक्षेप निरर्थख ठरतो.कारण रार्ष्टीय स्वयंसेवक संघाने आपली संघटना ही केवळ सास्कृतिक संघटना असल्याचे वारंवार जाहीर केलेले आहे.
दूरदर्शन आणि आकाशवाणी ही सरकारी माध्यमं असली तरी सत्ताधारी पक्षांनी त्याचा आपल्या हेतूसाठी वापर केलेला आहे हा इतिहास आहे.आणीबाणी असेल किंवा नंतरच्या काळातही प्रसार भारतीनं सत्ताधाऱ्यांची बटिक म्हणूनच भूमिका बजावलेली आहे. सत्तेवर असताना कॉ्रगेसवाले जे करीत होते तेच आज भाजपवाले करीत असतील तर मग कॉग्रेसवाल्यांनी गळे काढण्याचं काहीच कारण नाही.. आजपर्यत जे चालत आलेले आहे तेे यापुढंही होत राङणार आहे.या सरकारी माध्यमांना अधिक स्वायत्तता देण्याबाबत आता नव्याने चर्चा सुरू झाली आहे.हे होणार असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे.असं झालं तर मग मोहन भागवतच नव्हे तर अन्य संघटनांचे कार्यक्रमही थेट प्रक्षेपित केले जाऊ शकतील.मोहन भागवत यांचं भाषण थेट प्रक्षेपित कऱण्यास विरोध कऱणारे फार तर हा न्याय इतरांनाही मिळाला पाहिजे अशी मागणी करू शकतात.पण बातमी का दिली हा विरोधाचा विषय असू शकत नाही.संपूर्ण भाषण लाइव्ह दाखवावे की नाही यावरही चर्चा होऊ शकते पण आरएसएस ही सत्ताधारी पक्षाशी संबंधित संघटना असल्याने ते तेवढा फायदा तर घेणारच ना.
Sir your views are absuletly correct