दूरदर्शनचा नवा राडा

0
862

काही दिवसांपूर्वीच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा ‘अकरावे जिंनपिंग’ आणि गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांचा ‘भारताच्या राज्यपाल’ असा उल्लेख केल्यामुळे टीकेचे लक्ष्य ठरलेल्या दूरदर्शनने गुरुवारी आणखी एक घोडचूक झाली. डीडी न्यूजने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट सांताक्लॉझच बनवले. पंतप्रधानांसह भाजप नेत्यांच्या एका बैठकीच्या छायाचित्राची माहिती देताना डीडी न्यूजने ‘चीनमधील प्राणीसंग्रहालयात सांता क्लॉजच्या वेषातील माणूस माकडांना खाऊ घालताना…’ अशी ओळ छापली. यामुळे दूरदर्शनचा बेफिकीर कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक गुरुवारी झाली. या बैठकीचे छायाचित्र डीडी न्यूजच्या सोशल मीडिया विभागाने तत्काळ ट्विटरवर प्रसिद्ध केले. मात्र, त्याची माहिती देताना चीनमधील एका प्राणीसंग्रहालयातील फोटोची माहिती दिली. ही चूक लक्षात येताच ट्वीट केलेले हे छायाचित्र डीडीने तत्परतेने काढून टाकले आणि चुकीबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. मात्र, तोपर्यंत डीडीने पंतप्रधानांना सांताक्लॉझ बनविल्याचे ट्वीट ‘सोशल मीडिया’वाल्यांनी देशभरात पोहोचवले. त्यामुळे डीडीची चांगलीच नाचक्की झाली.या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दूरदर्शनच्या व्यवस्थापनाने चुकीसाठी जबाबदार असलेल्या महिला कर्मचाऱ्यास व तिच्या निरीक्षकास तातडीने विभागातून हटविण्यात आले आहे.(MATA)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here