मुंबई ( टीम बातमीदार ) मुंबई गोवा महामार्गाच्या रूंदीकरणाचा दुसरा टप्पा तातडीने सुरू करावा या मागणीसाठी पत्रकारांनी 25 जून रोजी केलेल्या कशेडी रोको आंदोलनास यश येत असून दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू कऱण्यात येणार अस्लयाची माहिती केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते यांनी काल मुंबईत दिली.पत्रकारांच्या आंदोलनाचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.गीते याच्या घोषणेचं रायगड प्रेस क्लबनं स्वागत केलं आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर असून इंदापूर ते कशेडी या दुसऱ्या टप्प्याचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीनंतर रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली.
आगामी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना वाहतुकीस अडथळ्यामुळे कोणताही खोळंबा होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते यांनी रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यंाना दिल्या आहेत.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे,त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस व्यत्यय येत आहे.तसेच रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघातही होत आहेत.या संबंधीच्या सतत तक्रारी केल्या जात आहेत.या पार्श्वभूमीवर अनंत गीते यांनी काल कोकणातील तीनही जिल्हयाच्या जिल्हाधिकारी तसेच नॅ़शनल हाय वे चे अधिकारी यांची एक बैठक मुूंबईत सह्याद्री अतिथीगृहावर बोलावून त्यांना गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहिल याची काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान