वरिष्ठ पत्रकार दीपक चौरसिया अडचणीत आलेत.आसाराम बापू यांच्या विरोधात आक्षेपार्ह कार्यक्रम प्रसारित कऱण्याबाबतचे त्यांच्यावर आरोप आहेत.या बाबत त्यांच्याविरोधात भादविच्या 469,120 बी, तसेच आयटीच्या कलम 67 बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकऱणी अटक टाळण्यासाठी दीपक चौरसिया यांनी हायकोर्टात केलेला अर्ज अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.चौरसिया यांनी आसाराम बापूसंबंधित काही कागदपत्रात फेरबदल किंवा खाडाखोड केल्याचे आणि ते सलाखे या कार्यक्रमात दाखविल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.आसाराम बापूच्या विरोधात काही आक्षेपार्ह क्लिपिंग दाखविल्याचाही चौरसियावर आरोप आहे.
हायकोर्टाने जामिन अर्ज फेटाळून लावतानाच खटल्याची चौकशी पुढे चालू ठेवण्याचे आदे श दिले आहेत.या प्रकरणात दीपक चौरसियाला अटक होऊ शकते.दीपक चौरसिया सध्या इंडिया न्यूज टीव्ही चॅनलचे एडिटर इन चीफ आहेत.