रत्नागिरी( टीम बातमीदार ) रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार दत्ता मुकुंद सावंत याचं आज दुःखद निधन झाले.द.मु.सा.यांनी आय़ुष्य़भर अत्यंत निष्ठेने पत्रकारिता केली.त्यामुळे व्यवहाराशी त्याचं सुत कधी जमलं नाही.परिणामतः आर्थिक आघाडीवर ते निर्धनच राहिले.त्यांमुळं त्यांच्या निधनानंतर त्याचं कुटुंबिय आज उघड्यावर पडलं आहे.मात्र कोकणातील पत्रकार मित्रांनी आम्ही सावंत यांच्या कुटुंबाच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत याचा प्रत्यय आणून देत जो मदतीचा हात समोर केला आहे त्याला तोड नाही.सावंत यांच्या कुंटुबियांसाठी मदतीचं आवाहन केल्यानंतर पाचशे रूपयांपासून पाच हजार रूपयांची मदत करण्याची तयारी किमान पन्नास पत्रकारांनी दाखविली आहे.प्रत्येकानं आपले मदतीचे आकडे व्हॅाटस ऍपवर टाकले आहेत.आम्हाला वाटतं हे मोठंच काम पत्रकार मित्रांनी केल ंआहे.ज्यानंी ज्यांनी आपल्या ऐपतीप्रमाणे सावंत यांना मदतीचा हात देऊ केला आहे अशा सर्वांना सॅल्युट करावा वाटतो.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील अनेक पत्रकारांची परिस्थिती फारशी चांगली नाही.त्यामुळेच आम्ही गेली वीस वर्षे पत्रकार पेन्शनची मागणी घेऊन लढतो आहोत.अन्य नऊ-दहा राज्यांनी पेन्शन योजना सुरू केली असली तरी महाराष्ट्र सरकारने अजूनही काही केलेले नाही.करण्याची सरकारची इच्छाही नाही.अशा स्थितीत आपणच एकत्र येत परस्परांना मदत करण्याशिवाय पर्याय नाही हे देखील आम्ही बारंवार सांगतो आहोत.कोकणातील पत्रकारांनी सावंत यांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढं करीत एक चांगला पायंडा पाडला आहे.हीच भावना सर्व पत्रकारांनी ठेवण्याचीही गरज आहे.मी देखील माझ्या परिने मदत करीत आहे.