नवी दिल्लीः महिलांवर अत्याचार करणार्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज संसद मार्गावर पत्रकार संघटनांनी निदर्शने करून सरकारचे लक्ष या महत्वाच्या विषयाकडं वळविण्याचा प्रयत्न केला.ज्या महिलांनी लैगिक शोषणाच्या कहान्या बेडरपणे मांडल्या आहेत.अशा सर्व पिडीत महिलांच्या पाठिशी उभे राङण्याचा निर्धार पत्रकार संघटनांनी केला.एम,जे अकबर यांच्यावर जवळपास आठ महिनाी यौन शोषनाचे आरोप केले आहेत.त्यांना तातडीने पदावरून हटविण्यात यावे अशी मागणीही मोर्चेकर्यांनी केली आङहे.हातात कार्यस्थल पर योन शोषण स्वीकार्य नही अशा अर्थाचे पोस्टर्स घेतले होते.एम.जे अकबर यांना हटवाचे नारे दिले जात होते.इंडियन वीमेंस प्रेस कॉर्प्स ( आईडब्ल्यूपीसी ) च्या अध्यक्षा टी.आर,राजलक्ष्मी म्हणालया,ज्या महिलांनी समोर येऊन आपल्यावरील अत्याचाराच्या कथा जगजाहीर केल्या त्या महिलांना आम्ही सलाम करतो अशा विषयांवर बोलायला मोठी हिंमत लागते.ती हिंमत या महिलांनी दाखविली.
या शिवाय प्रिन्ट अॅन्ड इलेक्टॉनिक मिडिया च्या पत्रकारांनी संसद मार्गावर फ्री स्कूल चर्च जवळ निदर्शने केली.योन शोषन संबंधी कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी अशी मागणी या पत्रकारांनी केली.कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून हाताखालील महिला पत्रकारांवर होत असलेल्या अन्यायाला आमचा विरोध आहे असा ठराव यावेळी संमंत केला गेला.