मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक आणि कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी यांज मंत्रालयात माहिती आणि जनसंपर्क विभागाचे नूतन महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांची सदिच्छा भेट घेतली.. परिषदेच्या पदाधिकारयांनी महासंचालकांची ४० मिनिटे चर्चा केली.. पोलीस राज संपल्यानंतर एक कवी मनाचा, साहित्यिक आणि पत्रकारांच्या प्रश्नांप़ती सहानुभूती बाळगणारा एक चांगला अधिकारी महासंचालक म्हणून लाभला आहे.. पांढरपट्टे यांच्या नियुकतीने माहिती आणि जनसंपर्क विभागात बदलाचे वारे वाहू लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.. पांढरपट्टे यांना शुभेच्छा देताना एस.एम.देशमुख यांनी मराठी पत्रकार परिषदेची माहिती देणारे संघर्षाची पंच्याहत्तरी, पत्रकार संरक्षण कायद्यासाठीच्या लढ्याची माहिती देणारे कथा एका संघर्षाची आणि रायगडची माहिती देणारे असा हा रायगड ही पुस्तके भेट दिली..
दिलीप पाढरपट्टे यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा