समुद्र शिवाजी म्हणून ख्यातकीर्त असलेले दर्यासारंग, सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांची आज पुण्यतिथी.. अरबी समुद्रावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे आणि इंग्रज, डच, पोर्तुगाल, आदि परकीय शत्रूंच्या उरात धडकी भरविणारया सरखेल कान्होजी राजे यांना स्वतंत्र भारतात न्याय मिळाला नाही याची खंत आहे.. ४ जुलै रोजी अलिबागेतील कानहोजींच्या समाधीवर पुष्प अर्पण करण्याचा सोपस्कार सोडला तर वर्षभर कान्होजीची याद देखील कोणाला येत नाही.. कान्होजीच्या जयंती, पुण्यतिथीचे कार्यक़म किमान कोकणातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयातून व्हावेत यासाठी पत्रकारांनी बरेच प़यत्न केले मात्र त्याला यश आले नाही.. कारण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव.. जी मंडळी कधी कान्होजींच्या समाधीवर किंवा आरसीएफ कॉलनी समोरिल पुतळ्यावर डोकं टेकवायला गेली नाही असे भक्त अलिबागचं नामांतर आग़ेबाग करण्याच्या पोस्ट टाकून वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करीत असते.. सुज्ञ अलिबीगकर अशा मागण्यांची दखल घेत नाहीत ही आनंदाची बाब म्हणावी लागेल.. खरं तर सरकारनं कान्होजी चं नाव महापुरूषांच्या यादीत समाविष्ट केले पाहिजे म्हणजे दर्यासारंग आंग़े यांची मर्दुमकी राज्यभर पोहचू शकेल.. आभाळा एवढं कर्तुत्व असलेल्या कान्होजी आंग़े यांचं नाव रायगडच्या बाहेर किती लोकांना विद्यार्थ्यांना माहिती आहे हा प़श्न आहे..याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे.. कोकणातील अनेक महापुरूषांचं अफाट कर्तुत्व नव्या पिढीला माहिती व्हावं यासाठी सरकारनं काही प़यत्न केलेच नाहीत..
कान्होजी राजे यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन