एस.एम.देशमुख आणि टीमने सलग बारा वर्षे लढा देऊन महाराष्ट्रातील पत्रकारांना पत्रकार संरक्षण कायदा मिळवून दिला.एवढंच नव्हे तर राज्यातील पत्रकारांचे छोटे-मोठे 21 प्रश्‍न सोडविले आणि गरजू अशा 23 पत्रकारांना जवळपास 30 लाख रूपयांची मदत केली किंवा मिळवून दिली .वयोवृध्द पत्रकारांना पेन्शन मिळाली पाहिजे यासाठी ते आता आग्रही आहेत.छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांची जी गळचेपी सुरू आहे त्याविरोधात ते आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत आणि मजिठियाची अंमलबजावणी न करणार्‍या व्यवस्थापनांच्या विरोधातही त्यांनी आता दोन हात करण्याची तयारी ठेवली आहे.एस.एम.देशमुख अहोरात्र पत्रकारांच्या हिताची चिंता करतात,त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात.मराठी पत्रकार परिषदेला एका उंचीवर नेऊन ठेवणार्‍या,राज्यातील पत्रकारांच्या सोळा संघटनांना एकत्र करून पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या माध्यमातून त्याचं नेतृत्व करणार्‍या एस.एम.देशमुख यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी शेगाव अधिवेशनाच्या निमित्तानं उपलब्ध होत आहे.
19 ऑगस्ट रोजी रात्री 7 ते 8 या वेळात आणि 20 ऑगस्ट रोजी सकाळी 8,30 ते 9.30 या काळात आपण एस.एम.देशमुखांशी थेट संवाद साधू शकता.मुख्य हॉलमध्ये. अगदी अनौपचारिकपणे..त्यांना आपण चळवळीची माहिती विचारू शकता,पुढील कार्यक्रमाची दिशा त्यांच्याकडून समजून घेऊ शकता.मात्र त्यासाठी शेगावला यावं लागेल.येत्या शनिवारी आणि रविवारी…
महाराष्ट्रातील 36 जिल्हे आणि 354 तालुक्यातील परिषदेशी जोडल्या गेलेल्या पत्रकारांचं नेतृत्व करणार्‍या देशमुखांना थेट भेटायला आपणास नक्कीच आवडेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here