मुंबई ः पाथरी येथील सामनाचे प्रतिनिधी माणिक केंद्रे यांच्या मृत्युने महाराष्ट्रातील माध्यम क्षेत्र ढवळून निघाले.उपचारासाठी पैसे नसल्याने एका पत्रकाराचा दुदैर्वी अंत झाल्याने हळहळ आणि संताप अशा दोन्ही भावना आज दिवसभर दिसून आल्या.माणिक केंद्रे यांना मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून मदत मिळाली नाही,अधिस्वीकृती नसल्याने माहिती आणि जनसंपर्क विभागानं मदत देण्याचा प्रश्‍नच नव्हता अशा स्थितीत हतबल झालेल्या माणिक केंद्रेंवर योग्य ते उपचार झाले नाहीत.त्याचं निधन झालं.त्यांच्या पत्नी अजूनही अकोला येथील एका खासगी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.माणिक केंद्रे तर गेलेच पण त्यांच्या पत्नीवर तरी योग्य उपचार व्हावेत यासाठी मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील पत्रकारांना मदतीचे आवाहन केले होते.माणिक केंद्रे यांच्या मुलीचा खाते क्रमांक देऊन परस्पर रक्कम तिकडे जमा करण्याचे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केेले होते.आरंभ म्हणून मराठी पत्रकार परिषदेने 11 हजार रूपये आणि एस.एम.देशमुख यांनी व्यक्तीगत स्वरूपात एक हजार रूपये जमा केल्यानंतर राज्यभरातून अक्षरशः मदतीचा ओघ सुरू झाला.दुपारी 2 ला आवाहन केल्यानंतर पाच-सहा तासातच जवळपास एक लाख रूपयांचा निधी माणिक केंद्रे यांच्या मुलीच्या खात्यात जमा झाल्याचे उपलब्ध पावत्यांवरून दिसते.अनेक पत्रकार मित्रांनी परस्पर आणि स्वतःचं नाव जाहीर न करता निधी जमा केला आहे.काही सामाजिक कार्यकर्त्यानी खाते नंबर मागून घेत केंद्रे याच्या मुलीच्या खात्यावर रक्कम जमा केली..या सर्वांचे कोणत्या शब्दात आभार मानावेत ते कळत नाही..कोणी पाच हजार दिले,कोणी दोन हजार ,कोणी एक हजार तर कोणी पाचशे रूपये दिले..रक्कम किती दिली यापेक्षा त्यामागच्या भावना मोलाच्या होत्या..अशी वेळ कोणावरही येऊ शकते याची जाणीव आता महाराष्ट्रातील पत्रकारांना झाली हे वाईटातून चांगले घडले असे म्हणावे लागेल…
मराठी पत्रकार परिषदेच्या आवाहनानुसार पत्रकारांनी आणि जनतेतून अनेकांनी मदत दिल्याबद्दल परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक,कार्याध्यक्ष शरद पाबळे  यांनी राज्यातील पत्रकारांचे आणि जनतेचे आभार मानले आहेत..मात्र मदतीचा हा ओघ थांबलेला नाही..सामनाचे मराठवाड्यातील पत्रकार निधी जमा करून येत्या दोन दिवसात मदत करणार असल्याचे सांगण्यात आलं आहे.तसेच मुंबईतील एका संस्थेनं माणिक केंद्रे यांच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे.मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातूनही एका वरिष्ठ अधिकार्‍याचा फोन आला होता,प्रस्ताव नव्याने दाखल करा मदत करण्यात येईल असे सांगितले गेले आहे.परभणी जिल्हयातील पत्रकार देखील पुढे येऊन मदत करणार आहेत.मुंबईत काही राजकीय नेत्यांनी संपर्क साधून मदतीची तयारी दर्शविली आहे.एका पत्रकाराच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील पत्रकार एकत्र आल्याचे चित्र प्रथमच बघायला मिळाले आहे..यापुढे कोणताही पत्रकार एकाकी असणार नाही हा संदेश यातून गेला आहे.माहिती आणि जनसंपर्कमधील अधिकार्‍यांच्या दयेवर आता आम्ही बसणार नाही हे देखील पत्रकारांनी दाखवून दिले आहे त्याबद्दल एस.एम.देशमुख यांनी आनंद व्यक्त केला आहे.
शंकरराव चव्हाण कल्याण निधीचे निकष बदलावेत आणि ही योजना केंद्राच्या धर्तीवर राबविली जावी यासाठी लवकरच परिषदेचे शिष्टमंडळ वरिष्ठांबरोबर बैठक घेणार आहे..

ReplyForward

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here