कोची: एका वकिलावर विनयभंगाचा खटला दाखल झाल्यने संतापलेल्या काही गुंड प्रवृत्तीच्या वकिलांनी बुधवारी आपला राग पत्रकारांवर आणि त्यांच्या संरक्षणासाठी धावलेल्या पोलिसांवर काढला.
केरल उच्च न्यायालयात कैक तास विविध प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंना या वकिलांनी कोंडून ठेवले. कोर्टाबाहेर जमलेल्या वकिलांच्या दुसर्या एका जमावाने पत्रकारांना धक्काबुक्की केली. त्यांत एक महिला पत्रकार होती. वकिलांच्या मारहाणीत ज़ख़्मी झालेल्या चार पत्रकारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारच्या हल्लया आधी मंगलवारी देखील केरल हायकोर्ट परिसरात बातमीदारांवरील हल्लयाच्या दोन घटना घडल्या होत्या.