पाकिस्तानात जियो न्यूजवर बंंदी घातली गेली,त्याचे पडसाद जगभरच्या माध्यमात उमटले.भारतातली स्थिती पाकिस्तानसारखी नसली तरी इकडंही आपल्या विरोधातल्या वाहिन्या किंवा वृत्तपत्रांवर निर्बन्ध आणण्याची खुमखुमी सत्ताधाऱ्यांना अधुन-मधून येत असते.नवनिर्वाचित तेलंंंगना राज्यातील सत्ताधारी आपल्या विरोधात आवाज उटविणाऱ्या दोन वाहिन्यांचे मागे हात धुवून लागले आहेत.टीव्ही-9 आणि एबीएन आंध्र ज्योती हे ते दोन चॅनल्स आहेत.
टीव्ही -9 च्या बुलेट न्यूज या कार्यक्रमात राज्यातील नवनिर्वाचित आमदारांच्या विरोधात व्यंगात्मक कार्यक ्रम दाखविला गेला होता.त्यामुळे सारेच आमदार संतप्त झाले.आमदारांच्या भावनांचा विचार करून टीव्ही-9 ने दिलगिरी देखील व्यक्त केली मात्र सरकार गप्प बसायला तयार नाही.विधानसभेत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी एक प्रस्ताव आणून चॅनलच्या विरोधात निर्णय घेण्याचा अधिकार स्पिकरला दिला गेला. या प्रस्तावावर अजून निर्णय व्हायचा असला तरी तत्पुर्वीच काही प्रभावी नेत्याच्या सांगण्यावरून राज्यातील केबल ऑपरेटर्सनी हे दोन्ही चनल्स दाखवायचे थांबविले आहे.त्यामुळे गेल्या पंचवीस दिवासांपासून टीव्ही-9 छोट्या पडद्यावर दिसतच नाहीत.हा सरळ सरळ वृत्तपत्र स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे अशी जनभावना आहे.दुसरीकडे आँध्र ज्योती हे चॅनल तेलंगना विरोधी असल्याचे ठरवून ते दाखवायला देखील बंदी धातली गेली आहे.सरकारच्या या धोरणाच्या विरोधात राज्यातील पत्रकार आणि जनतेने सोमवारी रस्त्यावर उतरून आपल्या भावना व्यक्त केल्या.सुखद गोष्ट अशी की,राज्यातील विविध पक्ष,संघटना,विद्यार्थी संघटनांना माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरून माध्यमांना पाठिंबा दिला आङे.