तुळजापूर ः तुळजापूर येथील दीव्य मराठीचे प्रतिनिधी प्रदीप अमृतराव यांच्यावर गुरूवारी काही गुंडांनी हल्ला केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
तुळजापूर येथील कमानवेश भागात काही गुंडांनी फेरीवाल्यांकडून बेकायदेशीर पैसे वसुली सुरू केली होती.ही माहिती अमृतराव यांना कळल्यानंतर त्यांनी कमानवेश भागात जाऊन फेरीवाल्याचे छायाचित्र काढायला सुरूवात केली.यावेळी गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला.कमानवेश भाागात झालेल्या अतिक्रमणामुळं भाविकांना जा-ये कऱण्यात अडथळे येत आहेत.नगरपालिका प्रशासन याकडं दुर्लक्ष करीत आहे.हल्लेखोरांनी अमृतराव यांना लाथा-बुक्कयांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.त्यामुळं अमृतराव यांना मुकामार लागला आहे.अमृतराव यांच्या जिविताला धोका असल्याने हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी पत्रकारांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या हल्ल्याचा धिक्कार करीत असून केवळ हाप्ते वसुलीचे फोटो काढले म्हणून झालेली ही मारहाण निषेधार्ह असल्याचे समितीने म्हटले आहे.मराठी पत्रकार परिषदेने देखील पत्रकारावरील या भ्याड हल्लयाचा निषेध केला आहे.