घटनेचं वार्तांकण करणं आणि मोकळं होणं एवढंच पत्रकारांचं काम आहे काय या प्रश्नाचं उत्तर सामाजिक बांधिलकी जपणारे पत्रकार नक्कीच नाही असं देतील.अनेक पत्रकार बातमीदारी करताना आपल्या सामाजिक जाणिवा मरू देत नाही.एका महिला पत्रकाराने आपल्या कृतीतून हे दाखवून दिलंय.अशाच एका महिला पत्रकाराचा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे.एका महिलेवर बलात्कार झाल्यानंतर या महिला पत्रकाराने केवळी रूक्षपणे बातमी देण्याचं काम केलं नाही तर आरोपीची लाईव्ह चांगलीच खरपटट्टी काढली शिवाय संबंधित पिडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी ती सातत्यानं अपिल करीत होती.या व्हिडीओचं अनेकजण स्वागत करीत आहेत तर काही शहाण्या पत्रकारांनी रिपोर्टर चं काम बातमी देणं हे आहे त्यानं पोलिसांची भूमिका बजावण्याचं काम नाही असं बोलायला सुरूवात केलीय.
(Visited 309 time, 1 visit today)