एकाच दिवशी राज्यातील तीन मान्यवर पत्रकारांचे निधन
मुंबई :धक्का बसावा, मन बैचेन व्हावं अशा बातम्या येत आहेत.. आज राज्यातील तीन ज्येष्ठ व मान्यवर पत्रकारांचे कोरोनानं निधन झालं..
उस्मानाबाद येथील समय सारथीचे संस्थापक, उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार मोतीचंद बेदमुथा यांचं आज कोरोनानं हैदराबाद येथे निधन झाले..
लोकसत्ताचे श्रीरामपूर येथील पत्रकार अशोक तुपे यांचंही आज निधन झाले.. अगोदर त्यांना कोरोना झाला होता, मात्र त्यातून ते बरे झाले होते. मात्र आज त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली..
ठाणे येथील वरिष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांचंही आज कोरोनानं निधन झालं..
तीनही मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली
राज्यात कोरोनानं बळी घेतलेल्या पत्रकारांची संख्या आता 105 झाली आहे..