पत्रकारांवरील हल्ल्याच्या मराठवाडयात तीन घटना
मुंबई :मराठवाडयातील पाटोदा, बदनापूर आणि धारूर येथे पत्रकारांवरील हल्ल्याच्या आणि पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमकीच्या तीन घटना घडल्या..
पाचोदा: आमदाराच्या दौरयात शेकडो कार्यकर्ते हजर असतात.. बातमी देताना सर्वांचीच नावे देणे शक्य नसते.. मात्र आपले नाव आले नाही कार्यकर्ते पिसाळतात आणि थेट पत्रकारावर हल्ले करतात.. पाटोदा तालुक्यातील दासखेड येथे पत्रकार डॉ. हरिदास शेलार यांच्यावर घरात घुसून भाजपच्या कार्यकर्त्यांनी याच कारणावरून हल्ला केला.. आमदार बाळासाहेब आजबे यांचा मतदार संघात दौरा होता.. मात्र बातमीत एका कार्यकर्त्यांचे नाव नसल्याने त्याने चिडून पत्रकारावर हल्ला केला.. पोलिसात तक़ार दिली आहे..
बदनापूर : जालना जिल्ह्यात वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे.. वाळू माफियांना अधिकरयाचे पाठबळ असल्याने वाळू माफियाची बातमी आली की अधिकारीही चवताळतात.. बीडचा लोकप्रश्न दैनिकात बातमी आल्याबद्दल एका वरिष्ठ महसूल अधिकारयाने कायदा हातात घेत पत्रकार संदीप पवार यांना मारहाण केली.. पोलिसात तक़ार दिली गेली आहे..
धारूर : 2006 मध्ये सामना वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका बातमीचा राग मनात धरून एका सोन्याच्या वयापारयाने आज धारूर येथील वरिष्ठ पत्रकार चद़कांत देशपांडे यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली.. पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे..
पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने आणि पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना पत्रकार संरक्षण कायद्याखाली नोंदविल्या जात असल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना पुन्हा वाढल्याचा आरोप पत्रकार हल्ला समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केला आहे..