परिषदेचे सर्व पदाधिकारी,विभागीय सचिव,जिल्हा अध्यक्ष
सप्रेम नमस्कार
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न 354 तालुक्यातील पत्रकार ही परिषदेची ताकद आहे.मात्र या तालुक्यातील अध्यक्षांशी परिषदेचा थेट कोणताही संपर्क नाही.त्यामुळं परिषद आणि तालुका अध्यक्ष यांच्यात संवाद होत नाही.ही अडचण दूर व्हावी आणि परिषदेला थेट तालुकयाशी संपर्क साधता यावा यासाठी फेब्रुवारीच्या तिसर्या आठवडयात नवी मुंबईत तालुका अध्यक्ष संवाद मेळावा घेण्याचे नक्की होत आहे.मात्र तालुका अध्यक्षांची नावं,फोन नंबर्स किंवा मेल आयडी परिषदेकडे नसल्यानं त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना निमंत्रण देणे शक्य होत नाही.तेव्हा विभागीय सचिव,जिल्हाअध्यक्ष आणि सोशल मिडिया सेलच्या सदस्यांना विनंती आहे की,आपआपल्या विभागातील,जिल्हयातील तालुका अध्यक्षांची माहिती तातडीने सरचिटणीस अनिल महाजन यांच्याकडं पाठवावी.तालुका अध्यक्षांच्या मेळाव्यास मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात येत असून उत्कृष्ट तालुका अध्यक्षांच्या पुरस्काराचे वितरणही तेथेच केले जाणार आहे.सर्वाना मेळाव्याचे थेट निमंत्रण पाठविता यावे यासाठी तालुका अध्यक्षांचे संपर्क क्रमांक हवे आहेत.ते पाठवावेत ही पुनश्च विनंती.कळावे एस.एम.देशमुख —