तहसिलदारांची मोगलाईः
दैनिक चंपावतीपत्रचे पाटोदा येथील प्रतिनिधी पोपटराव कोल्हे यांच्याविरोधात पाटोद्याच्या तहसिलदारांनी आकसापोटी गुन्हा दाखल केला आहे.पत्रकार पोपट कोल्हेचा गुन्हा होता,पाटोदा शहरातील पाणी टंचाईच्या विरोधात बाममीतून आवाज उठविणे हा..पाणी टंचाईची बातमी आली आणि तहसिलदारांना मिर्च्या झोंबल्या.त्यामुळं त्यांनी सूड भावनेने पोपट कोल्हे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला पोलिसांना भाग पाडले.या प्रकाराची संतप्त प्रतिक्रिया बीड जिल्हयात उमटली.बीड जिल्हयातील पत्रकारांनी ठिकठिकाणी या घटनेचा निषेध तर केलाच त्याचबरोबर निवेदनं देऊन तहसिलदार रूपा चित्रक यांची बदली करून त्यांची चौकशी कऱण्याची मागणी केली.याच मागणीसाठी आज पाटोद्यात एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन,मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे,चंपावतीपत्र दैनिकाचे संपादक नामदेवराव क्षीरसागर आदि उपस्थित होते.जिल्हाभरातून शंभरावर पत्रकारांनी या धऱणे आंदोलनात सहभाग नोंदविला.नंतर उपविभागीय अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.एस.एम.देशमुख यांनी हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानी घातला आहे.