शेतकरी कामगार पक्षाने बॅरिस्टर अ.र.अंतुले यांच्याविरोधात अनेक निवडणुका लढविल्या पण आता त्यांना त्यांचेच नाव घेत प्रचार कऱण्याची वेळ आली आहे असा आरोप रायगड लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केला आहे.
अलिबाग येथे आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सुनील तटक रे यांनी त्याच्यावर शेकाप नेते जयंत पाटील यांनी केलेले सर्व आरोप खोडून काढले.घाबरलेल्या विरोधकांना माझा पराभव करणे शक्य नसल्याने त्यांनी कधी माझ्या नावाशी साधर्म्य असलेला उमेदवार शोधणे तर कायद्याच्या माध्यमातून हरकती घेणे सुरू केले आहे.मला टार्गेट केल्याशिवाय त्यांना पर्याय नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कोकण रेल्वे मार्गाचे रूदीकरण,मुबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण केले तर दळणवळण अधिक सुलभ होईल,कोकणाताही पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल आणि कोकणाचा विकास होईल त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण कऱण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.