ढगाळ वातावरण आणि त्यातच गुरूवारी रात्री रायगडच्या काही भागात झालेला पावसाचा शिडकावा याचा विपरित परिणाम जिल्हयातील आंबा,कांदा,वाल तसेच अन्य कडधान्यावर होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.हापूसच्या 30 हजार आणि काजूच्या 10 हेक्टर क्षेत्रावर वातावरणाचा परिणाम होणार असल्याची शक्यता कृषी विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केली.यंदा थंडी चांगली असल्याने आंब्याचे उत्पादन चांगलले येईल अशी शक्यता शेतकऱ्यांना वाटत होती.रायगड जिल्हयात 44 हजार 400 हेक्टर क्षेत्रावर आंबा उत्पादन घेतले जाते.या साऱ्याच क्षेत्रातील आंब्यांना मोहोर चांगला आल्याने आंबा उत्पादक खुषीत होते.मात्र ढगाळ वातावरणामुळे हापूस फुलकिडयांच्या संकटात सापडला आहे.काजू पिकावरही या वातावरणाचा परिणाम होणार आहे.जिल्हयात 15 हजार 405 हेक्टरावर काजू घेतले जातात.
जिल्हयात 1 हजार हेक्टरवर वाल,300हेक्टरवर पांढरा कांदा,मात्र यावरही वातावरणाचा परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांनी रोग प्रतिबंधात्मक औषधी फवारावीत असे आवाहन करण्यात आले आहे.