अपघातग्रस्त पत्रकारास मदत
कोणताही पत्रकार यापुढे एकाकी असणार नाही असा शब्द मराठी पत्रकार परिषदेने शेगाव अधिवेशनात दिला होता.त्याची आता पुर्तता होताना दिसते आहे.परिषदेच्या पुढाकारने गरजू पत्रकारांना मदत करण्यासाठी शेकडो हात पुढे येत आहेत.बीड जिल्हयातील पत्रकारांनी तर स्वतःचा कल्याण निधी उभारून पत्रकारांना मदत करण्याचा अत्यंत स्तुत्य,अभिनंदनीय उपक्रम सुरू केला आहे.भास्कर चोपडे यांच्या उपचारासाठी बीडमधील परिषदेच्या पदाधिकार्यांनी मोठीच मदत केली.दुदैर्वानं चोपडे याचं निधन झाल्यानंतरही त्यांच्या कुटुंबियांना परिषदेने मदत केली आहे.त्यामुळं आम्ही आता एकटे नाहीत परिषद आमच्यासोबत आहे हा विश्वास पत्रकारांच्या मनात निर्माण झाला आहे.
या विश्वासाला बळ देणारी आणखी एक घटना आज बीडमध्ये घडली.बीड येथील पत्रकार अविनाश वाघिरकर हे एका अपघातात जखमी झाले.त्यांच्या पायाला मोठीच दुखापत झाली.मराठी पत्रकार परिषदेच्या बीड शाखेने तातडीने त्यांची भेट घेऊन त्यांच्यावरील उपचारासाठी आर्थिक मदत दिली आहे.परिषदेच्या या भूमिकेचं आणि तातडीने पत्रकारांच्या मदतीसाठी धावून जाण्याच्या कार्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन,जिल्हा अध्यक्ष सुभाष चौरे,सरचिटणीस विलास डोळसे,ज्येष्ठ संपादक राजेंद्र आगवान,सर्वोत्तम गावरस्कर,नरेंद्र कांकरिया,विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य अनिल वाघमारे ,उपाध्यक्ष शेख शाकेर,परिषद प्रतिनिधी विशाल साळुंके आदि यावेळी उपस्थित होते.