डोगराला लागलेल्या आगीत तळ्यात मोठे नुकसान

0
1233
रायगड जिल्हयात डोंगरांना आणि जंगलांना आगी लावण्याचे प्रकार वाढले असून काही दिवसापूर्वी खालापूरनजिकच्या डोांगराला लागलेल्या आगी नंतर सोमवारी तळे किल्ला परिसरातील डोंगराला लागलेल्या वणव्यात 60 ते 70 एकरात लावलेल्या ओवा,काजू झाडांचे मोठे नुकसान झाले आहे.
वणवा लागलेला परिसरात विपूल प्रमाणात जैवविविधता आहे.औषधी वनस्पतीबरोबरच साग,खैर,शिसव,अशी मौल्यवान वनसंपदा तेथे आढळते.या परिसरात चंदनाचीही झाडे असल्याने वनसंपदेचे मोठे नुकसान झाले आहे.वणवा कोणी का लावला याचा तपास लागलेला नाही.लागलेली आग आटोक्यात आणण्याचा वनविभागाने प्रयत्न केला असला तरी अजूनही आग धुमसत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
रायगड जिल्हयात जानेवारी ते मार्च या काळात डोंगरांना वणवे लागण्याचे अनेक प्रकार घडतात.यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून भस्मसात होते.जंगली प्राण्याच्या शिकारीसाठी ,लाकडं मिळविण्यासाठी हे वणवे लावले जातात असे सांगितले जाते.मात्र वर्षानुवर्षे हे वणवे लागत असले तरी त्यातले आरोपी सापडत नाहीत किंवा त्यांच्यावर कारवाईही होत नाही.डोगराला आग लावल्यामुळे वनविभागाने कोणावर कारवाई केल्याचे एकही उदाहरण नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here