धुळ्यातील एका डॉक्टराला झालेल्या मारहाणीनंतर मार्डनं संपाचं आवाहन केलं आणि सारे डॉक्टर संपावर गेले.त्याचा फटका अनेक रूग्णांना बसला.उपचार न मिळाल्याने अनेकांचे प्राण गेले.संप मिटावा यासाठी सरकार आपल्या परिनं प्रयत्न करीत होते.न्यायालयानंही डॉक्टरांना कामगारांसारखे वागू नका अशी तंबी देत कामावर रूजू व्हायला सांगितलं होतं.यामध्ये माध्यमंही मागे नव्हती.विविध वाहिन्यांनी डॉक्टरांच्या संपावर शो करीत दोन्ही बाजू लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.हा प्रयत्न करताना कोणीही डॉक्टरांना झालेल्या मारहाणीचं समर्थन करीत नव्हतं.मात्र डॉक्टरांचं रूग्णांना वेठीस धरणं हे देखील कुणालाच मान्य नव्हतं.संघटीत वर्गाच्या अशा झुंडशाहीला सर्वांचाच विरोध होता.झी-24 तासनंही डॉक्टरांच्या ंसपावर शो केला होता.त्यात डॉक्टरांचे प्रतिनिधी जसे होते तसेच मंत्री गिरीश महाजनही होते.दोन्ही बाजू लोकांसमोर मांडण्याचा डॉ.उदय निरगूडकर यांनी प्रयत्न केला होता.या विषयावर त्यांची काही भूमिका होती ती मतंही त्यांनी निवेदन करताना व्यक्त केली होती.मात्र डॉक्टरांच्या संघटनेला आणि पदाधिकार्यांना हा शो बायस वाटला,हा शो करताना उदय निरगूडकर यांनी सरकारबरोबर मोठं डिल केलं असाही काहींचा आरोप होता.प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर काही डॉक्टरांनी उदय निरगूडकर यांना अर्वाच्च शिविगाळ करून सर्व डॉक्टर तुमच्यावर बॅन टाकतील,म्हणजे तुम्हाला कोणताही डॉक्टर यापुढे वैद्यकीय सेवा देणार नाही अशी धमकी दिली गेली.वैद्यकीय सेवा देण्यास नकार हा किती मोठा गुन्हा आहे हे सर्वांनाच ज्ञात आहे मात्र डॉक्टर सरळ अशी धमकी देत आहेत.तुम्ही आमच्या बाजूनंच बोला किंवा शो करा अशी ही दादागिरी आहे.या धमक्यांचे तसेच अरेरावी भाषांचे काही एसएमएस डॉ.उदय निरगूडकरांना आलेले आहेत.ते आणि त्याला निरगूडकरांनी दिलेले उत्तर येथे दिलेले आहे.या एसएमएसमधील मार्डच्या पदाधिकार्यांची भाषा किती उध्दटपणाची आहे हे दिसून येईल.समाजमनात डॉक्टारांबद्दल प्रचंड नाराजी असताना डॉक्टरांची ही अरेरावी त्यांच्याबद्दलची सर्व सहानुभूती संपुष्टात आणणारी आहे.संघटनेच्या जिवावर कोणीही माध्यमांवर अशा प्रकारे दबाव आणू शकत नाही.माध्यमं त्याचा विरोध करतील तसेच लोकहितासाठी लढत राहतीलआणि अशा कोणत्याही संघटीत वर्गाच्या धमक्यांना भिक घालणार नाहीत हे डॉक्टरांनी लक्षात असू द्यावे.
उदय निरगुडकरांना धमक्यांचे फोन किंवा एसएमएस आल्यानंतर त्यांनी आयएमएच्या सचिवांना एसएमएस पाठवून आपली भूमिका कळविली होती.त्यावर आयएमएच्या सचिवांनी उत्तर दिलं आङे.हे दोन्ही एसएमएस खाली दिलेले आहेत.
उदय निरगूडकरांचा एसएमएस
This is what I wrote to dr Sanghavi SecyDr Parthiv Sanghavi
SecyDr Parthiv Sanghavi ji namaskar … many doctors have been sending hate mails to me and threatening that I should be banned from receding any medical help for my show on doctors strike … that’s fine … but stupidly they have been dragging my cardiologist wife doctor student daughter isha right at Manipal and son studying in U.K. … they also dragged my brother dr RAVI Sabnis as Nadiyad for no fault of theirs ….am sure you know threatening to deny medical service is a serious offence ….I won’t react in hostility and knee jerk manner in which some of the doctors reacted and objected to my statements … fine for their diagnosis …. should you wish before declaring patient dead doctor tries his best to conduct few more tests … should you wish me and my entire team at zee 24 taas is willing to have few more tests by doctors … it’s my team and my pleasure to invite you for a meeting about each and every point of The show … our past contribution to your field …. my own contribution to IMA in last few years …. if you think it’s possible most welcome or else I can’t help to make Doctor community understand the other side of the story ….regards dr uday Nirgudkar editor in chief of zee 24 taas and entire team …. ( by the way MARD and chief minister have paid rich tribute in writing to me and my teams efforts to solve the current problems of doctors and raising their issues in the past ….) :
( by the way MARD and chief minister have paid rich tribute in writing to me and my teams efforts to solve the current problems of doctors and raising their issues in the past ….) :
उदय निरगूडकरांना आलेले एसएमएस
Dr. Can always refuse to treat any patient without any reason except in emergency. In OPD DR CAN REGUSE ANY PATIENTSo Nirgudkar don’t mislead the society
Dr. Can always refuse to treat any patient without any reason except in emergency. In OPD DR CAN REGUSE ANY PATIENT
So Nirgudkar don’t mislead the society by saying anything and yes, get this confirmed by a lawyer
That’s a very modest comment