पत्रकार दिलीप डासाळकर हल्ला प्रकरण
चौकशी करून पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे जिल्हा पोलीस अधिक्षकांचे पत्रकारांना आश्वासन
परभणी(प्रतिनिधी)दि.16ः- सेलू येथील पत्रकार दिलीप डासाळकर यांच्यावर दोन दिवसापूर्वी झालेल्या हल्या प्रकरणी कसून चौकशी करून हा हल्ला पत्रकारीतेशी संबंधीत घटनेतून घडला असल्यास पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन परभणीचे जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी परभणी जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीला दिले.
प्राचार्य सुरेश नाईकवाडे यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हयातील पत्रकारांचे एक शिष्टमंडळ आज जिल्हा पोलीस अधिक्षकांना भेटले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षकांना पत्रकारांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी पत्रकारांनी हा हल्या प्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली असता या घटनेचा आपण सखोल चौकशी करत असून तसेच पत्रकार संरक्षण कायद्याचाही आपण अभ्यास करत आहोत. घटना कोणत्या अनुषंगाने घडली याची चौकशीअंती निष्कर्ष येताच आपण कलमे वाढवू तसेच पत्रकार संरक्षण कायद्यान्वयी गुन्हा दाखल करू, आरोपींना तात्काळ अटक करणार असल्याचेही त्यांनी यावेळी पत्रकारांनी सांगीतले. यावेळी प्रविण देशपांडे, विनोद कापसीकर, मोहन धारासुरकर, प्रभू दिपके, राजु हट्टेकर, हनुमंत चिटणीस, लक्ष्मण मानोलीकर, लक्ष्मीकांत बनसोडे, प्रविण चौधरी, मंदार कुलकर्णी, संजय घणसावंत, सुधाकर श्रीखंडे, सुरेंद्र पाथरीकर, सुदर्शन डाके, श्रीकांत कुलकर्णी आदी पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here