न्यूयॉर्क ःन्यूयॉर्कः माध्यमं कायम विरोधी पक्षांच्या भूमिकेत असल्यानं सत्ताधार्यांशी माध्यमांचे खटके सातत्यानं उडत असतात.त्याला भारत जसा अपवाद नाही तसाच अमेरिकाही अपवाद नाही.सत्ताधार्यांना न पचणार्या किंवा न आवडणार्या बातम्या आल्यानं अलिकडं काही चॅनल्स विरोधात घेतलेली भूमिका असेल,माध्यमांवर दाखल केले गेलेले कोट्यवधींचे दावे असतील किंवा या घटना माध्यमं आणि सत्ताधारी याचं बरं चाललंय हे दाखविणार्या नक्कीच नाहीत.अमेरिकेतही असंच चाललंय.आलेली प्रत्येक बातमी आपल्या विरोधातलीच आहे असा ग्रह करून घेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांच्या विरोधात मोहिमच उघडली आहे.या मोहिमेचाच एक भाग म्हणून त्यांनी फेक न्यूज पुरस्कार जाहीर केले असून त्यात न्यूयॉर्क टाइम्सला पहिला पुरस्कार जाहीर केला आहे.त्यांच्या यादीत अमेरिकेतील बहुतेक सारेच प्रतिष्ठित वृत्तपत्रे आहेत.याचा अर्थ एकही वृत्तपत्र सत्य बातमी देत नाही असा समज त्यांनी करून घेतलेला दिसतोय.आपल्याकडंं गल्लीबोळातील दादांना नको असलेली,न आवडणारी बातमी आली की,ते थेट पत्रकारांच्या अंगावर जातात.ट्रम्प हे स्वतःला जगाचे दादाच समजतात.त्यांनीही माध्यमांना अशाच प्रकारच्या धमक्या द्यायला अगदी ते राष्ट्राध्यक्ष झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून सुरूवात केलेली आङे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे .माध्यमांशी फार चांगले संबंध नाहीत किंबहुना माध्यमांच्या ते कायम विरोधात असतात.उभयांमधील संबंध आता अधिकच चिघळले आहेत असं दिसतंय त्यामुळं ट्रम्प महाशयांनी माध्यमांच्या विरोधात मोहिमच उघडली आहे.त्यानी काय करावं ? वृत्तपत्रे खोट्या बातम्या देतात असं गृहित धरून फेक न्यूज अॅवॉर्ड जाहीर केले आहेत.न्यूयॉर्क टाइम्स या अमेरिकेतील प्रतिष्ठित आणि जगभर दबदबा असलेल्या वृत्तपत्राला त्यांनी फेकन्यूज प्रथम पुरस्कार जाहीर केला आहे.ट्रम्प महोदयांनी टिंंट्वरव्दारे आपल्या अभिनव (?) पुरस्कारांची घोषणा केलीय.पुरस्कार विजेत्यांची यादी अगोदर रिपब्लिक नॅशनल कमिटीच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली होती.मात्र नंतर थोडयाच वेळात ही वेबसाईट क्रश झाली.या यादीतील तपशिलानुसार अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये एबीसी न्यूज,सीएनएन,टाइम आणि द वॉश्गिंटन पोस्ट या वृत्तपत्रांचा समावेश आहे.ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळविला त्या दिवशी न्यूयॉर्क टाइम्सने पुलिल्झर पारितोषिक विजेते पॉल क्रुगमन यांनी आता अर्थव्यवस्था कधीच रूळावर येणार नाही अशी बातमी दिली होती.ट्रम्प यांनी या बातमीला पहिला पुरस्कार दिला आहे.
2017 हे वर्ष अत्यंत पक्षपाती,अयोग्य वार्ताकनाचे आणि फेकन्यूज पेक्षाही खालच्या पातळीवर जाणारे होते.अध्यक्ष ट्रम्प यांच्याविषयी आलेल्या 90 टक्के बातम्या नकारात्मक होत्या असे अभ्यासाअंती दिसून आल्याचं वेबसाईटनं म्हटलं आहे.इस्लामिक स्टेंटची पीछेहाट सुरू आहे,अर्थव्यवस्था तेजीत आहे,गुंतवणूक आणि नोकर्या परत येत आहेत.आणखी बरचं काही घडत आहे.याकडं आपण दुर्लक्ष करू शकत नाहीअगदी पक्षपाती माध्यमेही नाही.असं ट्विटही ट्रम्प यांनी केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची ही पुरस्कार कल्पना अनेकांना गंमत वाटत असली तरी ती तशी नाही.माध्यमांचं मानसिक खच्चीकरण करून जनमानसातं माध्यमांच्या विश्वासार्हतेलाच तडा देणारी ही योजना आहे.आज भारतात आणि जगातही जे छापून येतं ते सत्य असतं असा वाचकांचा समज आहे.अशा करामतींमुळं वृत्तपत्रांची विश्वासार्हताच धोक्यात येणार आहे.ती अधिक घातक आहे.ट्रम्प यांनी याचा विचार करायला हवा होता.