सत्तेला प्रश्न विचारलेलं अजिबात आवडत नाही.त्यातही अडचणीचे प्रश्न असले की,सत्ताधीश हिस्त्र होतात.हे टाळण्यासाठी त्यांच्याकडं दोन पर्याय असतात.मन की बात सांगत एकतर्फी संवाद घडवून आणायचा वा प्रश्न विचारणार्यांचा आवाज बंद करायचा.अमेरिकेचे राष्ट्राघ्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसरा पर्याय निवडला.एका पत्रकार परिषदेच डोनाल्ड ट्रम्प यांना सीएनएनच्या पत्रकाराने मध्यवर्ती निवडणुकांच्या वेळेस तुम्ही विस्थापितांचा प्रश्न का पुढे आणला असा पत्रकाराचा प्रश्न विचारला.जीम अकोस्टा असं या प्रश्न विचारण्याचा गुन्हा करणार्या पत्रकाराचं नाव.अस्कोटाचा प्रश्न विस्थापितांच्या संबंधी होता.प्रश्न विचारताच ट्रम्प यांच्या रागाचा पारा चढला.त्यांनी अस्कोटा यांना गप्प बसायला सांगितले.एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर तू तुझा माईक बंद कर..तुझ्या सारखा माणूस जेव्हा सीएनएन सारख्या चॅनलमध्ये काम करतो त्याची कंपनीने लाज बाळगण्याची गोष्ट आहे.तुला कुठे काय बोलायचे ते कळत नाही.तू एक उध्दट माणूस आहेस असं म्हणत ट्रम्प यांनी सत्तेचा माज दाखवत पत्रकाराचा पानऊतारा केला.
समोरचा कितीही हिस्त्र झाला तरी पत्रकार हेका सोडत नाहीत .त्यानं ट्रम्प यांना दुसरा प्रश्न विचारला.2016 मध्ये जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली तेव्हा या निवडणुकीत रशियाचा सहभाग होता असा आरोप केला जातो त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे हा पत्रकाराचा दुसरा प्रश्न.त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणखीनच चिडले.पत्रकाराचे ओळखपत्र काढून घेतले गेले आणि आपल्याकडं एखादया तालुक्यातल्या नगरसेवकानं ज्या पध्दतीनं पत्रकारावर खकसावं त्या पध्दतीन अमेरिकेचे अध्यक्ष पत्रकारावर खेकसले. तुला लोकप्रतिनिधीशी कसं बोलावं हे कळत नाही.तुझ्यासारखा माणूस सीएनएनमध्ये कसं काय काम करू शकतो.तुझ्यासारख्या माणसाला आणि चॅनलला फक्त फेक न्यूज चालवायच्या असतात.त्यानं तुम्हाला टीआरपी मिळतो पण तुम्ही देश चालवू शकत नाही ते माझं काम आहे असं नायक या चित्रपटाच्या स्टाइईलनं डायलॉग त्यानी फेकला.
हे सारं घडल्यावर माध्यमं ट्रम्प यांच्यावर चिडली.ट्रम्प यांचा पत्रकार आणि पत्रकारितेकडं पाहण्याचा दृष्टीकोनच चुकीचा आहे.ट्रम्प धोकायदायकच नाहीत तर अस्वस्थ करणारे अमेरिकन आहेत.पत्रकारितेचं स्वातंत्र्य त्यांना मान्यच नाही हे त्यांनी अगोदरच स्पष्ट केलंय.आनंदाची आणि स्वागताची गोष्ट अशी की,अमेरिकन अध्यक्षांशी पंगा घेतल्यानंतरही सीएनएनचं व्यवस्थापन खंबीरपणे अस्कॉटा यांच्या पाठिशी उभे आहे.आपल्याकडं एखादया पत्रकारानं नेत्याशी पंगा घेतला की,मालक त्याला वार्यावर सोडतात.तो शब्दशः रस्त्यावर येतो.या पार्श्वभूमीवर सीएनएनचं अभिनंदन केलं पाहिजे.बरं झालं नरेंद्र मोदी पत्रकारांना भेटत नाहीत,पत्रकार परिषद घेत नाहीत नाही तर पत्रकारांना रोज असे अनुभव घ्यावे लागले असते.