अलिाबागः टोलचा जन्मदाता मीच असून टोलचा विषय देखील मीच संपवेल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.पनवेल येथील कॉग्रेसचे नेते रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी कॉग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.त्यानिमित्तानं काल पनवेल येथे आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी काल बोलत होते.
खारघर येथील टोलच्या मुद्यावरून प्रशात ठाकूर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.त्याचा उल्लेख करून गडकरी म्हणाले,राज्यातील आघाडी सरकारने टोलधाडीचे सत्र उघडले आहे,त्याची मला लाज वाटते.हा विषय आपणच संपवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नितीन गडकरी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे लकवा मारलेले मुख्यमंत्री आहेत असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्याना लगावला.
या कार्यक्रमास विनोद तावडे,सुधीर मुनगंटीवार आदि उपस्थित होते.ठाकूर पिता-पुत्रांच्या प्रवेशामुळे रायगड जिल्हयात भाजपचा प्रभाव वाढणार आहे.
टोलचा विषय मीच संपविणार
(Visited 126 time, 1 visit today)