टीव्ही,डिजिटल मिडियातील पत्रकारांना
वर्किंग जर्नालिस्ट कायद्याचे लाभ मिळणार
नवी दिल्ली ः इलेक्टॉनिक आणि डिजिटल मिडियातील पत्रकारांना वर्किक जर्नालिस्ट अॅक्ट लागू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी दिली.
इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट या पत्रकार संघटनेच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच संतोष गंगवार यांची भेट घेतली.यावेळी ंगंगवार यांना संघटनेच्यावतीने विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.शिष्टमंडळाशी बोलताना गंगवार म्हणाले,कायद्यातील सर्व विसंगती दूर करून एक इलेक्टॉनिक आणि डिजिटल मिडियातील पत्रकारांना त्यात सामावून घेतले जाईल यावेळी शिष्टमंडळानं वृत्तपत्र मालकांनी सुरू केलेली कॉन्ट्रॅक पध्दत तातडीने बंद करण्याची तसेच श्रमिक पत्रकारांच्यावेतन निश्चितीसाठी दर आठ वर्षांनी वेतन आयोगाची पुनर्रचना कऱण्याची मागणी केली.आपल्या विविध मागण्यासाठी आयएफडब्लूजे आणि अन्य दहा पत्रकार संघटनांच्यावतीने येत्या 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत निदर्शने कऱण्यात येणार आहेत.
वर्किंग जर्नालिस्ट अॅक्ट 1955मध्ये अंमलात आला.त्यावेळेस केवळ प्रिन्ट मिडियातील पत्रकारांचाच या कायद्यात समावेश करण्यात आला.मराठी पत्रकार संघटनेने या संदर्भात राज्य सरकारकडं अनेकदा अर्ज विनंत्या करून डिजिटल मिडियातील पत्रकारांना श्रमिक पत्रकारांसाठीच्या कायद्याचे लाभ मिळावेत अशी मागणी केलेली आहे.टीव्ही जर्नालिस्टसाठी हा कायदा लागू नसल्याने कामाच्या वेळापासून अनेक सुविधांपासून हा वर्ग वंचित आहे.आता टीव्ही आणि डिजिटल मिडियाचा या कायद्यात समावेश होणार असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे असे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
मराठी पत्रकार परिषदेचा पाठिंबा
आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्लील आयएफडब्लयूच्यावतीने निदर्शने कऱण्यात येणार आहेत.या आंदोलनास मराठी पत्रकार परिषद तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने पाठिंबा जाहीर केला आहे.