नव्या,तरूण चेहर्‍यांना संधी

0
997

परिषदेचे पदाधिकारी नेमताना नवीन आणि तरूण चेहर्‍यांना संधी

शरद पाबळे नवे कोषाध्यक्ष तर राजेंद्र काळे,

शिवराज काटकर,विजय दगडू नवे उपाध्यक्ष

मुंबई दिनांक 7 (प्रतिनिधी ) 80 वर्षांची दीर्घ परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या 2017-2019 सालासाठीच्या नव्या पदाधिकार्‍यांची घोषणा करण्यात आली आहे.नवीन टीममध्ये एक कोषाध्यक्ष , तीन उपाध्यक्ष,दहा विभागीय सचिव,कार्यकारिणी सदस्यांचा समावेश असून पदाधिकार्‍यांच्या नियुक्तया करताना नव्या आणि तरूण चेहर्‍यांना संधी दिली गेल्याने त्याचे राज्यभर स्वागत होत आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक नुकतीच मुंबईत झाली.परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.बैठकीत नव्या पदाधिकार्‍यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.बैठकीस परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख,विश्‍वस्त किरण नाईक,कार्याध्यक्ष गजानन नाईक आणि सरचिटणीस अनिल महाजन यांच्यासह मावळते विभागीय सचिव,परिषद प्रतिनिधी,विविध जिल्हयांचे अध्यक्ष मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

कोषाध्यक्ष म्हणून पुणे येथील सकाळचे बातमीदार शरद पाबळे यांची निवड करण्यात आली आहे.

बुलढाणा येथील देशोन्नतीचे पत्रकार राजेंद्रकुमार काळे,सांगली येथील बेळगाव तरूण भारतचे प्रतिनिधी शिवकुमार काटकर,आणि हिंगोली जिल्हयातील विजय दगडू यांची परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती कऱण्यात आली आहे.परिषदेची वाढती व्याप्ती,परिषदेचा राज्यभर होत असलेला विस्तार आणि वाढत्या सदस्य संख्येमुळे यावेळेस प्रथमच तीन उपाध्यक्ष नेमण्याचा निर्णय कार्यकारिणीने एकमताने घेतला आहे.

परिषदेचे विभागीय सचिव हे परिषदेचे कान आणि डोळे असतात.त्यामुळं विभागीय सचिव म्हणून कोणाच्या नियुक्ती होते याकडे सगळ्यांचे लक्ष असते.यावेळेस परिषदेने विभागीय सचिवाची तरूण टीम दिली आङे.बेळगावसाठी यावेळेस प्रथमच स्वतंत्र विभागीय सचिव नियुक्त कऱण्यात आला असून गोव्याची जबाबदारी कोल्हापूरच्या विभागीय सचिवावर सोपविली जाणार आहे.

नव्या विभागीय सचिवांची नावे आणि त्यांचे विभाग खालील प्रमाणे आहेत.

मुंबई विभाग ः विनोद जगदाळे ( न्यूज 24 ब्युरो चीफ )

कोकण विभाग ः संतोष पेरणे ( बातमीदार,सकाळ कर्जत-रायगड )

पुणे विभाग ः बापुसाहेब गोरे ( पिंपरी-चिंचवड )

कोल्हापूर विभाग ः समीर देशपांडे ( लोकमत,कोल्हापूर )

लातूर विभाग ः विजय जोशी ( सामना,नांदेड )

औरंगाबाद विभाग ः प्रमोद माने ( महाराष्ट्र टाइम्स ,औरंगाबाद )

अमरावती विभाग ः जलालुद्दीन गिलानी ( यवतमाळ )

नागपूर विभाग ः योगेश कोरडे ( नागपूर )

नाशिक विभाग ः आण्णा साहेब गणपत पाटील बोरगुडे ( सकाळ ,निफाड )

बेळगाव विभाग ः प्रकाश माने (बेळगाव)

कार्यकारिणीचे तीन सदस्य परिषद नियुक्त करीत असते.त्यानुसार हेमंत डोर्लिकर ( चंद्रपूर ,भास्कर ) आणि राम शेवडीकरी ( नांदेड संपादक उद्याचा मराठवाडा ) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच कायदेशीर सल्लागार म्हणून मुंबई हायकोर्टातील विधिज्ञ जयेश वाणी यांनी सहकार्य करावे अशी त्यांना विनंती करण्यात आली असून ती त्यांनी मान्य केली आहे.

बैठकीत आदर्श तालुका आणि जिल्हा संघ पुरस्कारांची नावेही नक्की करण्यात आली.शिवाय हा कार्यक्रम 6 जानेवारी 2018 रोजी सिंधुदुर्ग नगरीत घेण्याचाही निर्णय घेतला गेला आहे.या निमित्तानं बाळशास्त्री जांभेकर याचं कॅलेंडरी प्रसिध्द करण्यात येत आहे.6 जानेवारी रोजीचा पत्रकार दिन राज्यभर जल्लोषात साजरा करण्याचा निर्णयही बैठकीत घेतला गेला असून परिषदेची ध्वज संहिताही तयार करण्यात येत असून 6 जानेवारी रोजी ध्वजाचे अनावरण करण्याचा निर्णयङी घेतला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here