अधिवेशन यशस्वी करू.. नांदेडच्या पत्रकारांचा निर्धार
नांदेडला होतो काल.सोबत अधिस्वीकृती समितीचे सदस्य अनिल वाघमारे होते.. मराठी पत्रकार परिषदेचं ४२ वं अधिवेशन नांदेडला व्हायचंय.. त्यादृष्टीनं तयारी सुरूय… अधिवेशनाच्या अनुषंगानं काल नांदे्डमधील पत्रकारांशी चर्चा केली.. उपस्थित पत्रकारांची मतं जाणून घेतली.. अधिवेशनासाठी पत्रकारांची टीम सज्ज असल्याचं पाहून आनंद वाटला.. नांदेड जिल्हा पत्रकार संघाची सारी टीम तरूण आहे.. स्वाभाविकपणे अधिवेशनाबददल त्यांना कमालीचा उत्साह आणि औत्सुक्य आहे.. नांदेडला 1997 ला अधिवेशन झालं होतं…तयानंतर तब्बल 22 वषाॅंनी एेतिहासिक नांदेड नगरीत परिषदेचं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे..22 वषा॓त गोदावरीतून बरंच पाणी वाहून गेलं आहे.. जिल्हयात आज परिषदेशी संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ ही एकमेव पत्रकार संघटना कार्यरत आहे. पत्रकारांसाठी काही करायचं आहे, समाजाचंही आपण काही देणं लागतो या जाणिवेतून नांदेडची टीम काम करतेय.. त्यांच्यात कमालीचा एकोपा आणि परस्पर आदराची भावना दिसते .. त्यामुळे पुर्वी कधी नव्हे एवढी संघटना भक्कम झाली आहे.. अधिवेशनाची जबाबदारी नांदेडकर टीमवर सोपवताना परिषदेने या सर्व गोष्टींचा विचार केला.. आमचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मंडळी जिद्दीनं कामाला लागल्याचं पाहून आनंद वाटला.. अधिवेशन केवळ यशस्वीच नव्हे तर ते अविस्मरणीय करून दाखवू असा विश्वास अध्यक्ष प़दीप नागापूरकर, शहराध्यक्ष विश्वनाथ देशमुख, माजी अध्यक्ष प़काश कांबळे, गोवर्धन बियाणी, परिषद कार्यकारिणी सदस्य रामभाऊ शेवडीकर, सरचिटणीस सुभाष लोणे यांनी व इतरांनी बोलून दाखविला.. ज्येष्ठांची मदत आणि माग॓दशॅन ही आमच्याकडची मोठी शिदोरी असल्यानं अधिवेशन यशस्वी होणारच असं प्रत्येकजण सांगत होता.. अधिवेशनासाठी केवळ दीड महिना उरलाय.. तयारीला आजपासूनच सुरूवात करण्याचं ठरलं.. अडीच हजार पत्रकार अधिवेशनासाठी येतील.. त्यांची निवास, भोजण व्यवस्था करणं सोपं नाही…परंतू काळजी करू नका आम्ही येणारया पाहुण्याचं स्वागत नांदेडच्या परंपरेला साजेसं करू असा विश्वास आम्हाला दिला गेला.. नांदेडच्या टीमचं वैशिष्ट्ये असंय की, ते बोलतात ते करून दाखवितात.. अनेक प़संगी हे दिसून आलंय.. त्यामुळं नांदेडचे हे 42 वं अधिवेशन भव्य दिव्य होणार याबद्दल आमची खात्री झाली.. औरंगाबाद, पिंपरी, शेगाव प़माणे पत्रकारांनी मोठ्या प़माणात नांदेडला यावं एवढीच विनंती आहे.. नांदेड शहर रस्ते, रेल्वे आणि हवाई मागैॅ जगाला जोडलं गेलेलं आहे.. त्यामुळं अडचण नाही.. माहूर, औढा, परळी, गुरुद्वारा अशी अनेक धार्मिक स्थळं जवळ असल्यानं वैचारिक मेजवाणी बरोबर पयॅटन देखील होणार आहे..
परिषदेच्या अधिवेशनातून पत्रकार नवी प़ेरणा, नवी उजाॅ घेऊन जातात असा अनुभव असल्याने परिषदेच्यादृषटीनं या अधिवेशनाला विशेष महत्व आहे.. नांदेडकर तर सज्ज आहेतच पण हे अधिवेशन यशस्वी करण्याची जबाबदारी परिषदेला मातृसंस्था संबोधणारया राज्यातील प़तयेक पत्रकाराची आहे हे विसरता कामा नये..