मुंबई ( टीम बातमीदार ) टाइम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पत्रकार श्री.प्रफुल्ल मारपकवार वेगळ्या,वैशिष्टयपूर्ण आणि शोधक बातम्या देणारे पत्रकार म्हणून ओळखले जातात.त्यांच्या अनेक बातम्यां महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना धक्के देणाऱ्या ठरल्या आहेत.आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये Force-Feeding: CMO knew of incident same day या मथळ्याखाली प्रसिध्द झालेली त्यांची बातमी कॉग्रेसच्या सत्ताधाऱ्यांची आणि विशेषत्वाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची झोप उडविणारी ठरली आहे.दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात मागच्या आठवड्यात जे नाट्य घडले त्याची वाच्यता पाच दिवसांनी झाली.तब्बल पाच दिवसांनी त्यासंबंधीच्या बातम्या आल्या आणि नंतर देशभर त्याचे पडसाद उमटले.या घटनेवर भाष्य करताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तमानपत्रात बातम्या आल्यानंतरच आपणास महाराष्ट्र सदनात काय घडलं त्याची माहिती मिळाली असं सांगितलं होतं.मात्र वस्तुस्थिती तशी नव्हती.17 जुलै रोजीच म्हणजे घटना घडली त्याच दिवशी बिपिन मलिक यांनी सीएमओला त्यासंबंधीची माहिती दिलेली होती.मात्र मुख्यमंत्री कार्याळयानं त्याची दखल घेतली नाही.त्यानंतर तीन दिवसांनी मुख्यमंत्री दिल्लीला गेले.त्यावेळेस दिल्लीतील अधिकाऱ्यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली होती.पण काहीच हालचाल झाली नाही.नंतर मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले पण तोपर्यत बराच उशीर झाला होता.आरंभीच्या काळात हे प्रकरण दडपविण्याचाच प्रत्येक पातळीवर प्रयत्न झाल्याचे बातमीत नमूद केले गेले आहे.या साऱ्या घटनेच्या संदर्भात मलिक यांनी जो गुप्त अहवाल सरकारला पाठविला तोच मारपकवरा यांच्या हाती लागला असून तो टाइम्सच्या ऑन लाईन आवृत्तीवर टाकला गेला आहे.हे सारं प्रकरण दडपविण्यामागं केवळ रमजानच्या काळात वाद नको एवढाच उद्देश होता की,आणखी काही हे अजून स्पष्ट झालेलं नाही.मात्र प्रफुल्ल मारपकवार यांनी या विषयाला तोंड फोडल्यानंतर या बातमीचा फॉलोअप अनेक वाहिन्यांनी केल्याचं आज दिसून आलं.
प्रफुल्ल मारपकवार हे मुळचे नागपूरचे.हितवादला काम केल्यानंतर ते 25 वर्षांपूर्वी मुंबईत आले.आरंभीच्या काळात इंडियन एक्स्प्रेसमध्ये काम केल्यानंतर ते टाइम्स ऑफ इंडियात रूजू झाले.आदर्श प्रकरणापासून राजकारण्यांना धक्के देणाऱ्या अनेक बातम्या त्यांनी दिल्या आहेत.अधिस्वीकृती समितीचेही मारपकवार तीन वर्षे अध्यक्ष होते.या काळातही त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे ते ज्षेष्ठ सदस्य असून पत्रकार हल्ला विरोधी चळवळीसाठी त्यांचे योगदान महत्वाचे आहे.
आजच्या बातमीबद्दल अनेकांनी त्याना फोनकरून त्यांचे अभिनंदन केले आहे.
बातमीदारतर्फेही त्यांचे अभिनंदन आणि शूभच्छा.