शेतकरी नेते शरद जोशी यांच्या निधनाची बातमी काल सर्वच मराठी वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर ठळकपणे विस्ताराने दिली.टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी पत्रानं मात्र पहिल्या पानावर चार-सहा ओळीची बातमी आणि हाफ कॉलम बातमी देऊन वाचकांचा भ्रमनिराश केला. पान तीनवर मोठी बातमी असली तर शरद जोशी हे टाइम्सला पहिल्यापानावर त्याची सविस्तर दखल घ्यावी एवढे मोठे वाटले नाहीत हे विशेष.टाइम्स ऑफ इंडिया मराठी माणसं वाचत नाहीत असं टाइम्सच्या संपादकांना वाटतं की मराठी माणसं तेवढ्याच योग्यतेचे आहेत असा त्यांचा समज आहे माहित नाही.पण मराठी माणसांच्या निधनाच्या बातम्या देताना टाइम्सनं नेहमीच अशी कंजुषी दाखविली आहे.मागे मधु दंडवते गेले तेव्हाही टाइम्सचा असाच कद्रुपणा दिसला होता.