न्यूयॉर्क, दि. २२ – टाईम या मॅगझीनने काल रात्री उशीरा जाहीर केलेल्या जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये भारतातील बऱ्याच लोकांची वर्णी लागली आहे. यामध्ये अभिनेत्री प्रियंका चोप्रा, रिजर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, सानिया मिर्झा, गुगलचे सीईओ सुंदर पिचई आणि फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बंसल यांचा समावेश आहे. गत वर्षी टाईम्सच्या यादीत मोदींच नाव होते पण यंदा या यादीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच नाव वळगण्यात आल आहे.
टाईम मॅगझीनने जाहीर केलेल्या या यादीत अमेरिकन कंपोझर लीन मैनुएल-मिरांडा, ऑस्कर विजेता अभिनेता लिआनादौ दी कैपरियो यांचाही समावेश आहे. कला, संगीत, विज्ञान आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा यात समावेश आहे.
टाईम्सने रघुराम राजन यांचा विशेष उल्लेख करत ते एक उत्कृष्ठ अर्थशास्त्रज्ञ असल्याचे नमूद केले आहे. राजन हे दुरदृष्टीचे असून जगात आर्थिक मंदी आली असली तरी त्यांनी यात भारताला सावरल आहे.
जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये बराक ओबामा, पुतीन, मार्क झुकेरबर्गची पत्नी आणि विनोदी कलाकार अजित अंसारी यांचाही समावेश आहे.