अधिस्वीकृतीसाठी केलेला एखादा अर्ज जेव्हा नाकारला जातो तेव्हा त्याचे कारण संबंधित अर्जदारास कळविले जाते.काही अर्ज अत्यंत चुकीच्या कारणांसाठी नाकारले गेल्याचे समोर आले आहे.वेतन,मानधन नियमानुसार नाही असे कारण देत एक अर्ज नाकारला आहे.हा नियम सर्वांना लावायचा झाला तर एकाही पत्रकारास अधिस्वीकृती मिळणार नाही.कारण राज्यातील एकही दैनिक मजिठियाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वेतन,मानधन देत नाही.अर्ज नाकारताना इतरही अशी अनेक कारणं दिली जातात.त्यातील काही कारणं निमयबाहय आहेत.ज्या पत्रकारांना आपला अर्ज चुकीच्या काऱणासाठी नाकारला गेला असे वाटते,अशा पत्रकारांनी त्यांना डीआयओ मार्फत आलेली पत्रं परिषदेकडे पाठवावीत.ही सारी पत्रं परिषदेच्यावतीने महासंचालकांकडे सुपूर्द करून संबधित पत्रकारास न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.आम्हाला याची कल्पना आहे की,अनेकांवर अन्याय झालेला आहे.तो वरच्या कोर्टात जाऊन न्याय मिळविता येईल.अर्ज नाकारल्यानंतर संबंधित पत्रकारांनी रितसर महासंचालकांकडे अपिलही करावे.मात्र या अपिलाची सुनावणी निममित होत नसल्याने अन्यायग्रस्त पत्रकाराना न्याय मिळण्यास देखील विलंब होत आहे.
खालील इ-मेलवर अथवा व्हॉटसअॅपवर आपल्याला आलेली पत्रं पाठवावीत.
इ-मेल … smdeshmukh13@gmail.com
व्हॉटसअॅप 9423377700