ज्ञानेश भुकेले मारहाण प्रकरणी
विधान परिषदेत औचित्याचा मुद्दा..
आमदार निलमताई गोर्हे पत्रकाराच्या पाठिशी
पुणे, ता. १८ आज शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या, विधानपरिषद प्रतोद आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत मांजरी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या लोकसत्ताचे वार्ताहर ज्ञानेश भुकेले यांना सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांनी शनिवारी मारहाण केल्याची घटना औचित्याच्या मुद्द्याद्वारे मांडली. या घटनेत मुजोरपणे वर्तन केलेल्या सहायक पोलीस आयुक्त श्री निलेश मोरे यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
या *वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून विविध मागण्यांबाबत सूर केलेल्या बेमुदत उपोषणाचे शनिवारी (16डिसेंबर) ‘लोकसत्ता’चे वार्ताहर ज्ञानेश भुकेले या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेले होते. शासकीय अधिकारी प्रसाद आयुष यांनी मध्यस्थी करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केल्यावर श्री. भुकेले यांनी विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित काही प्रश्न आयुष यांना विचारले आणि मिळालेल्या उत्तराचे त्यांनी मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग करून घेतले. वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे हे भुकेले यांच्याकडे आले. ‘तू मोबाइलवर रेकॉर्डिंग का करतो’ अशी दमबाजी त्यांनी केली. वार्ताहर असल्याने सांगून भुकेले यांनी मोरे यांना ओळखपत्रही दाखविल्यानंतरही मोरे यांचा पारा चढला आणि त्यांनी पोलीस व्हॅनमध्येच भुकेले यांना मारहाण केली. त्यानंतर एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊन भुकेले यांना थेट हडपसर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. भुकेले यांना धमकावून त्यांच्याकडून जबरदस्तीने माफीनामा लिहून घेण्यात आला. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि ‘विद्यार्थी आंदोलनाबाबत चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारून मोबाइलवर रेकॉर्डिंग केले’, असा माफीनामाही लिहून घेतला. या घटनेची माहिती आ. डॉ. गोऱ्हे यांनी सभागृहात मांडली.*
आ. डॉ. गोऱ्हे यांनी केलेल्या चौकशीच्या मागणीवर खद दिल्या.
या बाबत आ. डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह राज्य मंत्री दीपक केसरकर, पोलीस महासंचालक सतीश माथुर, पुण्याचे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यानाही काल दिनांक १७ नोव्हेंबर २०१७ रोजी या घटनेची चौकशी करण्याबाबतचे निवेदन दिले होते. आज अनेक पत्रकारानी याबाबत त्यांचे अभिनंदन केले. हा विषय तातडीने मार्गी लावावा अशी मागणी यावेळी त्यांनी आ. डॉ. गोऱ्हे यांच्याकडे केली
आज विधानपरिषदेत हा विषय औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून त्यांनी मांडला असून पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबाबत दक्ष राहण्यासोबतच सौहार्दपूर्ण वागणूक देण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यावर लवकरच सकारात्मक कार्यवाही होण्याची अपेक्षा राज्यातील सर्व पत्रकारांकडून व्यक्त होत आहे.
___________________________