मनसेचे प्रमुख राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत.स्वतः राज ठाकरे यांनीच तशी घोषणा रविवारी नागपुरात केलीय.निवडणूक न लढविण्याचं त्यांनी जी कारणं दिलंय ती न पटणारी आहेत. .ते म्हणाले, “आमच्या कुटुंबातून आजपर्यंत कोणीही निवडणूक लढविली नाही,आमचा हा जेनेटिक प्रॉब्लेम आहे” .राज ठाकरे एवढ्य़ावरच थांबले नाहीत.ते पुढं म्हणाले,” आम्हाला कोणा एका मत दार संघावर लक्ष केंद्रीत करता येत नाही,संपूर्ण राज्यच आमचा मत दार संघ आहे.त्यामुळं निवडणूक न लढविण्याचा नि र्णय मी घेतला आहे.” राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर कालपासून उलट-सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्यानंतर त्यांनी सोमवारी दुपारी वाहिन्यांकडं “माझ्या विधानाचा विपर्यास केला गेलाय” असं स्पष्ट केलंय.राज ठाकरे यंाची दोन दिवसातील विधानं पाहिली तर त्यांचा जो धरसोडवृत्तीचा पिंड आहे त्याचा पुनःप्रत्यय येतोय.अगोदर जाहीर करायचं आणि त्यातून अडचणी वाढल्या की,मग माध्यमांवर खापर फोडून घुमजाव करायचं ही राज यांची सवय आहे. टोल नाका विरोधी आंदोलनाच्या वेळेस हे दिसलं,ब्ल्यु प्रिन्टच्या निमित्तान तेच पहायला मिळालं आणि आता निवडणुकीच्या निमित्तानंही त्याचाच प्रत्यय येतोय .मुळात लोकसभा निवडणुकात पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर त्यांनी “मला आपल्याशी बोलायचंय” अशी भावनिक साद घालत मनसे सैनिकांना बोलावलं होतं.त्यांच्यासमोर बोलताना त्यांनी “आपण विधानसभेची निवडणूक लढविणार असून पक्षाला बहुमत मिळालं तर राज्याचं नेतृत्वही करायची आपली तयारी असल्याचं” जाहीर केलं होतं.ही घोषणा करण्यामागं तेव्हा त्याचे दोन उद्देश होते. .भाजपनं नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यानं त्याचा लाभ पक्षाला झाला असा राज ठाकरे यांचा निष्कर्ष होता.त्याच ध र्तीवर आपणही स्वतःला मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं तर नक्कीच महाराष्ट्रातील जनता आपल्या पाठिशी उभी राहिल असा त्यांनी त र्क लढविला होता.अशी घोषणा कऱण्यामागं राज ठाकरेंचा दुसरा हेतू पक्ष संघटनेत नवसंजीवनी आणण्याचाही होता.पराभवाने गलितगात्र झालेल्या पक्ष कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी सेनापतीच मैदानात .उतरतोय म्हटल्यावर कार्यकर्ते पेटून उठतील,जोमानं कामाला लागतील असाही एक त्यांचा अंदाज होता.अशी घोषणा करून राज्यात आपण झंझावात निर्माण करू शकू असा जो मनसे प्रमुखांचा अंदाज होता तो प्रत्यक्षात आलाच नाही.त्यांच्या या घोषणेची दोन दिवस जरूर च र्चा झाली मात्र त्यातून पुढं फार काही हाती लागलं नाही.लोकसभेत सर्वस्व गमुविलेल्या राज यांची राज्याचं नेतृत्व करण्याची घोषणाही कोणी फारशी गांभीर्यानं घेतलीच नाही.उलट त्यांच्यासमोरच्या अडचणीत भर पडली. निवडणुक लढविण्याच्या आणि मुख्यमंत्री होण्याच्या त्यांच्या घोषणेनं त्यांच्या अडचणीत भरच पडणार याचं अनुमान काही राजकीय निरीक्षकांनी वर्तविलं होतं. ” त्यांचा इगो त्यांना निवडणूक लढवू देणार नाही” हे ही अनेकांना माहित होतं. त्यामागची काही कारणं होती.लोकसभा निवडणुकीतील मनसेचे प्रगती पुस्तक पाहिलं तर विधानसभेत त्यात काही मोठा बदल होईल अशी स्थिती नव्हती आणि नाही.मुख्यमंत्रीपदाचे मनसेचं स्वप्न हे दिवा स्वप्नच ठरण्याची शक्यता होती.राज ठाकरे कदाचित निवडून आले असते तरी चार-दोन आमदारांचं नेतृत्व विधानसभेत करून आणखी मानहानी करून घेण्याची वेळ त्यांच्यावर येणार हे वास्तव समोर दिसत होतं .स्वबळावर किंवा कोणाची तरी मदत घेऊन राज्यातील सत्ता हस्तगत कऱण्याची क्षमता मनसेकडं नाही हे ही एक वास्तव होंत.राजकारणातले जे जानकार आहेत त्यांना ते दिसतही होतं.परंतू पऱाभवानं सैरभैर झालेल्या राज ठाकरे यांनी भावनेच्या भरात निवडणूक लढविण्याची आणि मुख्यमंत्री होण्याची घोषणा केली.ती आता अडचणीची ठरतेय हे त्यांच्या फारच उशिरा लक्षात आलं.अगोदर केलेली घोषणा मागं घ्यायची तर त्याला काही तात्विक आणि तार्किक मुलामा देणं आवश्यक होतं.तो मुलामा देण्याचा त्यांनी काल नागपुरात प्रयत्न केलाय.परंतू निवडणुकीतून माघार घेण्याची जी कारणं त्यांनी सांगितली आहेत ती ना मनसैनिकांना पटलीत ना महाराष्ट्रातील जनतेला.निवडणूक न लढविणे हा जर जेनेटिक प्रॉब्लेम असेल तर हा प्रॉब्लेम मैदानात उतरण्याची भाषा करताना राज ठाकरेंना माहिती नव्हता काय? हा प्रश्न आज विचारला जातोय. शिवाय एक नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रच माझा मत दार संघ आहे हे ही एवढ्या उशिरा ध्यानात येण्याचं काय कारण? हा देखील प्रश्न जनतेसमोर आहे.या दोन्ही प्रश्नांचं उत्तर महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय परिस्थितीत आहे.लोसकसभेत भाजप-शिवसेनेने एकत्र लढत महाराष्ट्रात अभूतपूर्व यश संपादन केल्यानं भाजपबरोबर सुत जमविण्याच्या राज ठाकरे यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे.भाजप नाही म्हटल्यावर अन्य कोणताही पक्ष राज ठाकरेंबरोबर हातमिळवणी करण्यासाठी पुढं येताना दिसत नाही.( शेकापेच जयंत पाटील त्यासाठी मात्र उत्सुक आहेत ) उलटपक्षी लोकसभेतील अभूतपूर्व विजयानंतर भाजप-शिवसेना युती अधिक आत्मविश्वासाने विधानसभेला सामोरे जाताना दिसते आहे.त्यातही शिवसेनेत इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढल्यानं ” शिवसेनेला ति ची जागा( अवकात ) दाखवून देण्याची मनसेची भाषाही हेवतच विरल्यासारखी आहे.काही वाहिन्यांनी जे निवडणूकपूर्व सर्व्हे केले आहेत त्यात महाराष्ट्रात महायुतीची सत्ता बहुमतानं येणार असं स्पष्ट दिसून आलंय.त्याच बरोबर राज ठाकरे यांच्या पक्षाला दोन आकडी संख्याही पार करता येणार नाही असेही या अंदाज म्हटलं गेल्यानं पक्षनेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या नैरश्यात भर पडली असल्यास नवल नाही.अशा स्थितीत राज्याचं नेतृत्व कऱण्याची भाषा टिंगलटवाळीचा विषय ठरू शकते हे राज ठाकरे यांनी ओळखले.या खेरीज समजा राज ठाकरेंनी एखादा मत दार संघ निवडला,तेथून निवडणूक लढवायचं ठरविलं आणि ति थं जर त्यांचा पराभव झाला तर त्याचं सारं राजकारण आणि पतही संपुष्टात येण्याची शक्यता असल्यानं हा धोका स्वीकारण्यापेक्षा निवडणुकीच्या मैदानातुन सन्माननिय माघार घ्यावी असं त्यांनी ठरविलं असेल तर राजकीयदृष्या त्यांचा हा नि र्णय नक्कीच शहानपणाचा ठरू शकतो.त्यामुळं माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला वगैरे गोष्टी करीत राज ठाकरे यांनी ताकाला जाऊन भांडं लपविण्याचं अजिबात कारण नाही.माध्यमांनी जर त्यांच्या विधानाचा विपर्यास केला असं त्याचं म्हणणं असेल तर त्यांनी स्पष्ट शब्दात ते निवडणूक लढविणार आहेत की,नाही हे तरी जाहीर करावं.परंतू त्यांना अचानक माहित झालेला जेनेटिक प्रॉब्लेम आणि त्यांची बॉडी लॅग्वेज लक्षात घेता निवडणूक न लढविण्याचा नि र्णय त्यांनी घेतला आहे हे कोणाच्याही लक्षात येते. मात्र असा काही निर्णय आजच जाहिर केला तर पक्ष कार्यकर्त्याचं उरलं सुरलं अवसानही गळून पडेल आणि विरोधक रणछोडदास म्हणत आपली निर्भत्सना करतील अशी साधार भिती त्यांना वाटत असल्यानं ते सावरासावर करीत आहेत.
राज ठाकरेंवर ही सारी वेळ का आली ?त्याचं नेमकं कुठं आणि काय चुकलं ? या प्रश्नाची उत्तरही फार अवघड नाहीत .शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सुरूवातीचा काही काळ भावनेचं राजकारण त्यांनी केलं. नंतर ते स्वप्न विकायला लागले. “महाराष्ट्राची सुत्रं माझ्या हाती द्या,मी साऱ्यांना सुतासारखा सरळ करतो” हा विचार सांगत ते महाराष्ट्रात फिरले.त्यातून त्यांनी काही काळ नक्कीच वातावरण तयार केले.मनसेनं लढविलेल्या पहिल्या लोकसभेत त्यांना भलेही काही जागा मिळाल्या नसतील पण त्यांनी शिवसेनेची मोठी हानी केली.त्याचा मुंबईत आणि अन्यत्र कॉग्रेसला फायदा झाला.विधानसभेतही पहिल्या दणक्यातच मनसेला बारा जागा मिळाल्या.अपेक्षा अशी होती की,मनसेचे आमदार विधानसेभेत काही भरीव कामगिरी करतील,मात्र तसे झालेच नाही.नाशिक महापालिकेतही मनसेला काही दिवे लावता आले नाहीत.त्याच्या विकासाच्या ब्ल्यु प्रिन्टचा विषयही टवाळीचा ठरला.अनेक प्रसंगी त्यांची धरसोडवृत्ती प्रकर्षानं समोर आली.या साऱ्यातून राज ठाकरे केवळ स्वप्न दाखवितात हे वास्तव लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांनी राज ठाकरेंच्या पक्षाकडं पाठ फिरविली.लोकसभा निवडणुकीतली त्यांची भाषा आणि ठरवून केवळ शिवसेनेच्या विरोधातच उमेदवार उभे करण्याची त्यांची कृती मराठी जनतेला अजिबात आवडली नाही.त्यांनी स्वतःची रेषा वाढविण्यासाठी शिवसेनेची रेषा कमी करायचा प्रयत्न चालविला आहे,शिवसेना संपविण्याच्या कोणाच्या तरी कटात राज ठाकरे सहभागी झालेत असंही लोकांना वाटायला लागलं होतं.मराठी मतांचं विभाजन होता कामा नये ही बहुसंख्य मराठी मतदारांची भूमिका असल्याचं वास्तवही राज ठाकरे यांच्या लक्षात आलं नाही .ही आणि अशीच काही कारणं त्यांच्या पक्षाच्या मुळावर आलेली आहेत. राजकारणात साऱ्याच पक्षांच्या वाट्याला उन्हाळे-पावसाळे येतात.त्यामुळं मनसेला आज चटके बसत असतील तर त्यात फार वेगळं असंही काही नाही.आलेल्या वादळात भुईसपाट झालेले अनेक पक्ष कालांतरानं सावरल्याची अनेक उदाहऱणं आपणास भारतीय राजकाारणाच्या इतिहासात सापडतील. मात्र जे पक्ष केवळ लाटेवर स्वार होऊन धुमकेतू सारखे चमकतात ते कायमचे अस्तंगत होतात हा देखील इतिहास आहे.राज ठाकरेंनी एक लाट निर्मा ण केली.लोकांनी ती स्वीकारली,पण पक्षाला ती टिकविता आली नाही.त्यामुळंच मनसेला आज अस्तित्वासाठीच धडपड करावी लागत आहे.या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी मनसेला आता मोठी तपश्चर्या आणि आत्मचिंतन करावे लागणार आह.
smdeshmukh.blogspot.in या माझ्या ब्लॉगवरून या लेखाची कॉपी करता येईल
एस.एम.देशमुख