मराठी पत्रकार परिषदेच्या व्दैवार्षिक निवडणुका जुलैमध्ये होत आहेत.आपणास माहिती आहेच की,यंदाच्या निवडणुका ऑनलाईन करण्याचा निर्णय परिषदेने घेतलेला आहे.या निर्णयामुळे परिषदेचे किमान तीन लाख रूपये वाचणार आहेत.मात्र त्यासाठी मतदार यादी लवकर तयार होणे अपेक्षित आहे. दोन वेळा विनंती करूनही अजून काही जिल्हा संघांनी मतदार यादी आणि सदस्यता शुल्क तसेच संलग्नता शुल्क पाठविलेले नाही.ज्यांच्या याद्या आलेल्या नाहीत त्यांना अर्थातच मतदान प्रक्रियेत भाग घेता येणार नाही.परिषदेकडून वारंवार केल्या जाणार्या या विनंतीकडे दुर्लक्ष करून जिल्हा संघांचे पदाधिकारी आपल्या सदस्यांचा मतदानाचा हक्क डावलत आहेत हे सर्वाानी लक्षात घेतले पाहिजे.या निवडणूक प्रक्रियेत राज्यातील सर्व 35 जिल्हा संघांनी सहभागी व्हावे अशी परिषदेची इच्छा आणि प्रयत्न आहेत.त्यासाठी कृपया सर्वांनी सहकार्य करावे आणि आपली सदस्य यादी शुल्कासह उशिरात उशिरा 31 मार्च पुर्वी पाठवावी.त्यानंतर आलेली यादी कुठल्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही याची कृपया नोंद द्यावी.यादीबरोबर जिल्हा संघाचा चेक किंवा डीडी पाठविणे आवश्यक आहे.यादी पाठविताना सर्व सदस्यांचे व्हॉटसअॅप नंबरही आवश्यक आहेत.कोणत्याही जिल्हा संघानं व्हॉटसअॅपनंबरशिवाय यादी पाठविली आणि त्यामुळं संबंधित सदस्यांना मतदान करता आले नाही तर त्याची जबाबदारी संबंधित जिल्हा संघाची असेल आणि याबाबतची कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद ग्यावी.लोकशाही आणि पारदर्शक पध्दतीनं परिषदेच्या निवडणुका व्हाव्यात असा परिषदेचा आग्रह आणि प्रयत्न असून त्यासाठी सर्व जिल्हा संघांचे सहकार्य अपेक्षित आहे.जिल्हा संघाच्या सदस्यांनीही आपल्या पदाधिकार्यांनी सदस्यता यादी परिषदेकडे पाठविली की नाही याची चौकशी आपल्या पदाधिकार्यांकडे करावी आणि पाठविली नसेल तर त्यासाठी त्यांच्याकडं आग्रह धरावा ही विनंती आहे.परिषदेच्या विभागीय सचिवांनी देखील आपल्या विभागातील जिल्हा संघाची सदस्य यादी पाठविण्यासाठी संबंधित जिल्हा पदाधिकार्यांशी संपर्क साधावा आणि यादी लवकरात लवकर येईल याची दक्षता घ्यावी .
कळावे
आपला
यशवंत पवार
सरचिटणीस मराठी पत्रकार परिषद मुंबई