जिल्हा प़सिध्दी प्रमुख म्हणजे मराठी पत्रकार
परिषदेचे कान आणि डोळे :एस.एम.देशमुख
मुंबई :मराठी पत्रकार परिषदेने राज्यातील सर्व जिल्ह्यात नियुक्त केलेल्या जिल्हा प़सिध्दी प्रमुखांमुळे माध्यम क्षेत्रात घडणारी प्रत्येक घटना महाराष्ट्रभर पोहचायला मदत होणार असल्याचा विश्वास विश्वास मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला.
मराठी पत्रकार परिषदेने मुंबईसह राज्यातील ३६ जिल्ह्यात प़सिध्दी प़मुख नेमले आहेत.. ही टीम परिषदेचे कार्यक्रम, अन्य उपक़मांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आणि सोशल मिडियाव्दारे
व्यापक प़सिध्दी मिळेल याची तर काळजी घेणार आहेच त्याचबरोबर आपआपल्या जिल्हयातील माध्यम क्षेत्रात घडणारया बारीक घडामोडींवर नजर ठेऊन ही घटना जगाच्या वेशिवर मांडणार आहे.. त्यामुळे नागपुरच्या कळमेश्वर, रामटेकमध्ये काय घडतंय ते दुसरया क्षणाला सिंधुदुर्गच्या सावंतवाडी किंवा कणकवलीत समजणार आहे..थोडक्यात ही टीम परिषदेचे कान आणि डोळे म्हणून कार्यरत राहणार असल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली..
माध्यम क्षेत्रात घडणारया असंख्य सकारात्मक बाबी परिषदेच्या नव्या उपक़मामुळे जगासमोर येणार असून त्यातून पत्रकारांबद्दलचा समाजाचा नकारात्मक दृष्टीकोन कमी होण्यास मदत होईल असा विश्वास ही देशमुख यांनी व्यक्त केला आहे.. अशा पद्धतीची रचना असलेली मराठी पत्रकार परिषद ही देशातील पहिलीच पत्रकार संघटना असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले..
राज्यातील सर्व नवनियुक्त जिल्हा प़सिध्दी प्रमुखांचे एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, राज्याचे प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन यांनी अभिनंदन केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत..